अमेरिकेचा मुष्टीयोद्धा पॅट्रिक डे(वय-२७) याचा लढतीदरम्यान डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मृत्यू झाला. प्रतिस्पर्ध्याच्या जबरदस्त ठोशामुळे पॅट्रिक गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर चार दिवसांपासून पॅट्रिक कोमात होता. अखेर आज पॅट्रीक डे याची मृत्यूशी झुंज संपली.

शिकागो येथे सुपर वेल्टरवेट गटात चार दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी रात्री पॅट्रिक डे आणि अमेरिकेचाच बॉक्सर चार्ल्स कॉनवेल यांच्यात ही मुष्टीयुद्ध लढत होती. लढतीदरम्यान दहाव्या फेरीत पॅट्रिक नॉकआऊट झाला. कॉनवेलच्या जबरदस्त ठोशामुळे डे च्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याच्या मेंदूवर तातडीने शस्त्रक्रियाही केली. पण शर्थीचे प्रयत्न करुनही तो कोमात गेला.

याबाबत, पॅट्रिकचे प्रमोटर लोउ डिबेला म्हणाले की, ‘तो एक चांगला मुलगा, भाऊ असण्यासोबतच अनेकांचा खूप जवळचा मित्र होता. मदत करण्याच्या स्वभावामुळे इतरांच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड आदर होता. स्वतः शिक्षक आणि घरची परिस्थिती चांगली असतानाही तो बॉक्सिंगकडे वळला. या खेळात जीव जाण्याची शक्यता असल्याची कल्पना असूनही त्याने बॉक्सिंगला निवडलं. कारण त्याला बॉक्सिंगची आवड होती. पैसे कमावण्याचे त्याच्याकडे अन्य मार्ग उपलब्ध होते पण या खेळाने त्यांना सातत्याने चेतनादायी आयुष्य जगण्यास प्रेरणा दिली, तसेच त्यांच्या खेळामुळे इतरांनाही प्रेरणा मिळाली. या खेळामुळे पॅट्रिक जिवंतपणा अनुभवायचा”.

पाहा व्हिडिओ –