15 October 2019

News Flash

पिंपल्सने त्रस्त आहात? मग काकडीचा करा असा उपाय

त्वचेला ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण झाल्यानंतर चेह-यावर डाग, पुटकुळ्या येतात

उन्हाळ्यात थंडावा देणारी काकडी बहुतांशी सगळ्यांनाच आवडते. काकडीत ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व असून शरीराला आवश्यक अशा प्रमाणात पोटॅशियम आणि सोडियम यांची मात्रा असते. काकडीतील के जीवनसत्त्व हाडाच्या बळकटीसाठी उपयोगी आहे. प्रवासादरम्यान अनेक वेळा धूळ,माती उडाल्यामुळे हे धुलीकण चेह-यावर जमा होतात. यामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होऊन त्वचेला ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे चेह-यावर डाग, पुटकुळ्या येतात. तसेच प्रखर उन्हाचा सतत भडीमार झाल्यामुळेही त्वचा टॅन होते. सूर्यामधून बाहेर पडणा-या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा प्रभाव सरळ आपल्या त्वचेवर होत असतो. यामुळे त्वचेच्या मूळ रंगात बदल होऊन त्वचा काळवंडते. तर अनेक वेळा चेहऱ्यावर तारुण्यपिटीकाही (पिंपल्स) येतात. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी फळभाज्यांमधली काकडी उपयुक्त ठरु शकते.

१. काकडीचा रस –
काकडीच्या रसाचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक फायदा म्हणजे चेहऱ्यावरील मुरूम, पुटकुळ्या कमी करणे. काकडीचा रस चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावा. या मसाजमुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचे प्रमाण कमी होते. यासाठी एका काकडीचा रस चेहऱ्यावर लावावा आणि त्यानंतर काही वेळाने गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. मात्र यावेळी साबण किंवा फेशवॉशचा वापर करु नये. हा रस कमीत कमी दिवसातून दोन वेळा तरी लावावा.

२. काकडीच्या तुकड्यांनी मसाज करणे –
चेहऱ्यावर काकडीचा रस लावण्यासोबतच काकडीचे बारीक तुकडे करुन चेहऱ्यावर मसाज करावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि मुरुम कमी होतात. काकडीचे गोल आकारात काप करावे आणि त्यांनी काही वेळ चेहऱ्यावर मसाज करावा. दिवसातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग करावा.

३. काकडीचा फेसमास्क –
चेहऱ्यावर काकडीचा फेसमास्क लावल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. त्यासोबतच चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेलाचे प्रमाणही कमी होते. यासाठी काकडीची पेस्ट तयार करुन त्यामध्ये दही आणि मध मिसळावे. ही तयार पेस्ट चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने चेहऱ्यावरील हा लेप काढून थंड पाण्याने चेहरा धुवावा.

४. काकडी आणि कोरफडीचं जेल –
काकडी आणि कोरफडीचं जेल एकत्र करुन हा लेप चेहऱ्यावर लावावा. यासाठी एका काकडीच्या रसामध्ये कोरफडीचं जेल मिक्स करावं आणि हा लेप चेहऱ्यावर लावावा. २० ते २५ मिनीटे हा लेप चेहऱ्यावर लावून ठेवावा. हा लेप आठवड्यातून दोन- तीन वेळा लावावा.

५.त्वचेला डायड्रेटेड ठेवण्याचे काम काकडी करत असून काकडीमुळे चेह-याचा रंग उजळतो. या काकडीचे टोनर करण्यासाठी प्रथम काकडीचे साल काढून काकडी मिक्सरच्या सहाय्याने बारीक करुन तिच्यातील पाणी गाळणीने वेगळे करावे. हे पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरुन रोज दिवसातून दोन वेळा चेह-यावर शिंपडल्यास चेह-याचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.

First Published on September 13, 2019 5:43 pm

Web Title: use cucumbers in these ways to cure acne ssj 93