व्हॉट्सअॅप आज प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. सोशल मीडियात त्याला सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. भारतात व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची संख्याही कोट्यवधींची आहे. पण काही लोक थर्ड पार्टी अॅप वापरत असल्याचे व्हॉट्स अॅपच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच कंपनीने मोठ पाऊल उचलले आहे. थर्ड पार्टी अॅप वापरणाऱ्यांना व्हॉट्स अॅपकडून सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे. योव्हॉटसअप व्हॉटसअपसारखेच दिसणारे हे थर्ड पार्टी अॅप तुम्ही वापरत असाल तर त्वरीत बंद करा कारण यामुळे तुम्हाला व्हॉटसअॅप जास्त काळ वापरता येणार नाही.

जर कोणी क्लोन अॅपद्वारे किंवा थर्ड पार्टी अॅप वापरत असेल तर त्याचे अकाउंट तुर्तास बंद केले जाईल, असे व्हॉट्सअॅपने सुचित केले आहे. कंपनीने ही माहिती एका ब्लॉगच्या साह्याने दिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्यावर उपायही सांगितला आहे. त्यांनी म्हटले आहे की, थर्ड पार्टी अॅपवरून युजर कशा प्रकारे खऱ्या अॅपवर येऊ शकतात सांगितले आहे. तसेच कोणत्या प्रकारची थर्ड पार्टी अॅप तुमचे खाते बंद करू शकतात ते सुद्धा सांगितले आहे.

जीबी व्हॉटसअप हे व्हॉटसअपशी मिळते जुळते थर्ड पार्टी अॅप आहे. याचा वापर केल्यास व्हॉटसअप तुमचे अकाउंट बंद करू शकते, असा इशारा व्हॉट्सअॅपने दिला आहे. व्हॉटसअप प्लस या अॅपबद्दल कंपनीने याआधीही इशारा दिला होता. जर तुम्ही याचा वापर करत असाल तर तुमचे व्हॉटसअप अकाउंट ब्लॉक करण्यात येईल.