सण-उत्सवांच्या काळात अनेकजण आपापल्यापरीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळेच या ‘फेस्टिव्ह सिजन’मध्ये ग्लॅमरस दिसण्यासाठी आम्ही काही टिप्स येथे देत आहोत. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नसून, फक्त काही सोपे उपाय करायचे आहेत. सणासुदीच्या वातावरणात त्वचेची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. दिल्लीच्या ‘पचौली स्पा आणि वेलनेस’ सेंटरच्या कॉस्मेटोलॉजिस्ट प्रीती सेठ यांनी काही टिप्स दिल्या आहेत. आकर्षक दिसण्यासाठी या टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

खूप पाणी प्या – तुम्ही जेवढे पाणी प्याल तेवढी तुमच्या त्वचेची चमक वाढेल. जास्तीतजास्त पाणी प्यायल्याने शरीरातील अपायकारक घटक आणि टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते. यासाठी दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी जरूर प्या.

सूर्याच्या किरणांपासून बचाव करा – सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदी आणि सेलिब्रेशनसाठी तुम्हाला बाहेर जावे लागते. उन्हात फिरताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सूर्याच्या उष्णतेतून निघणारे अल्ट्रा-वायलेट किरण त्वचेसाठी अपायकारक असतात. त्यामुळे बाहेर पडताना जवळ छत्री बाळगा आणि SPF 45 सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडा. याशिवाय पूर्ण हाताचे कपडे घाला आणि डोळ्यांवर गॉगल लावा.

त्वचेला मॉश्चराइज करा – चेहरा दिवसातून केवळ दोन वेळाच धुवा, अधिक वेळा धुतल्यास तो रुक्ष पडेल. दररोज चंगल्याप्रतीचे हर्बल मॉश्चराइजर क्रिम चेहऱ्याला लावा. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि तजेलदार राहील.

क्लिंजिंग, टोनिंग और मॉश्चराइजिंग – दिवसातून एकदातरी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉश्चराइजिंग करा. क्लिंजिंगसाठी दूध आणि मॉश्चराइजिंगसाठी ऑलिव ऑईलचा वापर करा.

कोमट पाण्याने अंघोळ करा – अंघोळ करताना कोमट पाण्याचा वापर करा.

शरीर ठणठणीत राहावे म्हणून अनेकजण जिममध्ये घाम गाळतात अथवा बागेत व्यायाम करताना दिसतात. परंतु नियमितपणे घरातील एखाद्या कोपऱ्यात दोरीच्या उड्या मारल्यास याचा चांगला फायदा होऊ शकतो. दोरीच्या उड्या मारल्याने जिम अथवा व्यायामामुळे मिळणारे फायदे मिळतात. दोरीच्या उड्यामुळे केवळ आरोग्याचं नव्हे तर हृदय आणि त्वचादेखील चांगली राहते.