X

दीर्घकाळ तरुण दिसायचंय? मग ‘ही’ फळे खायलाच हवीत

बाह्यरुपासाठी प्रयत्न करण्यापेक्षा समस्येचे मूळ शोधून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्याचा निश्चतच चांगला फायदा होतो. यासाठी आपल्या आहार-विहारात बदल करणे आवश्यक असते.

वयस्कर झालेले कोणाला आवडते? बहुतांश जणांना आपण दिर्घकाळ तरुण दिसावे असे वाटत असते. हल्ली तर जास्तीत जास्त तरुण दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. मग हे वाढते वय लपविण्यासाठी कधी मेकअपचा आधार घेतला जातो तर कधी आणखी काही. पण बाह्यरुपासाठी प्रयत्न करण्यापेक्षा समस्येचे मूळ शोधून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास त्याचा निश्चतच चांगला फायदा होतो. यासाठी आपल्या आहार-विहारात बदल करणे आवश्यक असते. आहारात काही ठराविक घटकांचा समावेश केल्यास तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसू शकता. यातही फळांचे विशेष महत्त्व असून विविध घटकांनी युक्त असणाऱ्या फळांचा आहारात समावेश केल्यास त्वचा चांगली राहण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होतो. पाहूयात नेमकी कोणती फळे आपले वय जास्त दिसू नये म्हणून फायदेशीर ठरतात.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस आणि व्हीटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. या घटकांमुळे तुमचे वय वाढले हे दिसत नाही. तसेच त्वचेतील कोलेजन वाढण्यासही स्ट्रॉबेरी उपयुक्त असतात. त्यामुळे त्याचा आहारात वापर केल्यास तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसता.

सफरचंद

सफरचंदातील एन्झामाईन हा घटक शरीर आणि त्वचा फ्रेश ठेवण्यास उपयुक्त असतो. त्वचेला विशिष्ट टोन प्राप्त होण्यासाठीही सफरचंद फायदेशीर असते. ‘अॅन अॅपल अ डे कीप डॉक्टर अवे’ अशी प्रसिद्ध म्हण आहे. ती त्वचेच्या बाबतीतही उपयुक्त ठरते.

पपई

त्वचा उजळण्यासाठी पपई हा अतिशय उत्तम स्त्रोत आहे. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठीही पपईत असणारे घटक उपयुक्त ठरतात. रोज पपई खाल्ल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग इत्यादीपासून तुमची सुटका करतात.

कलिंगड

कलिंगडात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहण्यासाठी कलिंगड अतिशय उपयुक्त ठरते. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर नकळतच तुमची त्वचा चांगली राहते. त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळेही त्वचा चांगली राहते.

कीवी

डेंग्यूच्या आजारावरील उपाय म्हणून वापरले जाणारे कीवी हे फळ मागच्या काही काळात भारतात विशेष प्रसिद्ध झाले. डोळ्याखाली येणारे डार्क सर्कल, चेहऱ्यावरील सुरकुत्या यांसाठी कीवीतील अँटीऑक्सिडंटस उपयुक्त ठरतात. या फळात असणारे व्हीटॅमिन ई आणि सी हे तुम्ही लवकर वयस्कर दिसणार नाहीत असे काम करतात.

First Published on: September 10, 2018 4:14 pm