मधुमेह आणि कोलेस्टेरॉलचा त्रास ही सध्या अगदी सामान्य समस्या झाली आहे. जीवनशैलीशी निगडीत असणाऱ्या या गोष्टींवर वेळीच उपाय न केल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतात. सध्या प्रत्येक कुटुंबात मधुमेह असणारी क्मान एक व्यक्ती तरी असतेच. मग त्या व्यक्तीला कुटुंबातील सगळ्यांकडून आणि मित्रपरिवाराकडूनही सूचनांचा मारा केला जातो. हे केल्यास चांगले, ते केल्यास तुमची लवकर सुटका होईल असे एक ना अनेक उपाय सुचविले जातात. मग या व्यक्तींनाही मी नेमके काय करु असा प्रश्न पडतोच. मात्र वैद्यकीय उपचारांसोबत घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय केल्यास निश्चित फायदा होऊ शकतो. मश्रुमचा आहारातील समावेश या दोन्ही समस्यांसाठी फायद्याचा असतो.

१. अॅंटीऑक्सिडंटस – मश्रुममध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटीऑक्सिडंटस असतात त्यामुळे ते शरीरासाठी चांगले असते. यातही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्याचा जास्त फायदा होतो.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
Why a sunscreen over SPF 50 is still the best bet for the beach
तुम्हीही उन्हात जाताना ‘SPF 50’ सनस्क्रीन वापरताय का? मग त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात वाचाच
how to Make green chili pickle
घरच्या घरी झटपट बनवा हिरव्या मिरचीचं लोणचं! जेवणाबरोबर तोंडी लावा, नोट करा सोपी रेसिपी

२. प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत – प्रतिकारशक्ती चांगली असल्यास आपल्याला अनेक आजारांपासून दूर राहणे शक्य होते. मश्रुम शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असते. त्यामुळे मधुमेहामुळे सर्दी-पडशासारखे आजार लवकर होत असतील तर आहारातील मश्रुमचा समावेश उपयुक्त ठरतो.

३. कोलेस्टेरॉल – मश्रुम खाल्लायनंतर बराच काळ भूक लागत नाही. याशिवाय मश्रुम केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असते. काही अभ्यासांनुसार मश्रुममुळे कॅन्सर होण्याची शक्यताही कमी असते.

४. विटॅमिन डीयुक्त – विटॅमिन डी हाडांच्या मजबुतीसाठी अतिशय गरजेचे असते. मश्रुममध्ये विटॅमिन डीचा समावेश असल्याने योग्य प्रमाणात मश्रुम खाल्ल्यास त्याचा शरीराला फायदा होतो.

५. कार्बोहायड्रेटस- वजन आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहणे मधुमेह आणि कोलेस्टेरॉलसाठी आवश्यक असते. मश्रुममध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण कमी असल्याने ही पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होते.