21 January 2021

News Flash

Amazon Prime ची सेवा अवघ्या १२९ रुपयांत

जास्तीत जास्त ग्राहकांना जोडण्याचा प्रयत्न

अॅमेझॉन प्राईम हे मागच्या काही काळात प्रसिद्ध झालेले अॅप्लिकशन आहे. भारतीयांमध्येही हे अॅप कमी वेळात जास्त प्रमाणात वापरले जाऊ लागले. याआधी अॅमेझॉन प्राईमचे सबस्क्रीप्शन हवे असल्यास १ वर्षासाठी घेणे बंधनकारक होते. मात्र आता महिन्याभराचे सबस्क्रीप्शनही मिळणे शक्य असल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे. विशेष म्हणजे महिन्याभराच्या सबस्क्रीप्शनची किंमत १२९ रुपये असून ग्राहकांना त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा उपलब्ध होणार आहे. ही नवीन स्कीम नॉन प्राईम सबस्क्रायबरही घेऊ शकतात असे सांगण्यात आले आहे. सध्या वर्षभराच्या सबस्क्रीप्शनची किंमत ९९९ रुपये आहे.

अॅमेझॉन प्राईम सर्व्हिसची सुरुवात देशात जुलै २०१६ पासून झाली. सुरुवातीला याची किंमत ४९९ रुपये होती. मग वर्षभराचा प्लॅन लाँच करण्यात आला आणि आता महिन्याचा प्लॅन सुरु करण्यात आला आहे. महिन्याभराच्या सबस्क्रीप्शननंतर ग्राहकांना ही सेवा खंडीत करायची असेल किंवा पुन्हा रिन्यू करायची असेल तर तसे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. कंपनी आपल्या युजर्सना प्राईम व्हिडिओ आणि अॅमेझॉन म्युझिकसाठी फ्री सबस्क्रीप्शन देणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही नवीन सुविधा अतिशय फायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेतील याची वर्षभराची सर्व्हीस युजर्संना ११९ डॉलर म्हणजे सुमारे ८ हजार रुपयांना मिळते. २०१७ मध्ये अॅमेझॉनने प्राईम डे ला सुरुवात केली. यात युजर्संना एक्सक्लुसिव्ह डिस्काऊंट आणि कॅशबॅकचा फायदा मिळतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 2:37 pm

Web Title: users will get amazon prime service at rupees 129 monthly new plan
Next Stories
1 Video : प्लास्टीक बंदीनंतर किराणा आणायला जाताय? हा व्हिडियो पाहाच
2 विवाहितांना हृदयविकाराचा धोका कमी – अहवाल
3 Health Tips : वर्षा ऋतूत आहारात या पदार्थांचा सहभाग आवर्जून करा
Just Now!
X