गर्भधारणेत सौम्य वेदनाशामक औषधे (पॅरासिटामॉल) जन्माला येणाऱ्या मुलीच्या प्रजननक्षमतेला बाधक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉल घेतल्याने होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी तीन अहवालांचा अभ्यास केला. त्यात जन्माला येणाऱ्या मुलीच्या प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसून आले. पॅरासिटामॉल किंवा अ‍ॅसेटामिनोफेन ही औषधे जगभरातील गरोदर महिला घेतात. याच संशोधनाच्या आधारे पॅरासिटामॉल घेतल्याने पुरुषांच्या आणि महिलांच्या प्रजनन प्रणालीवर होणारा परिणाम तपासण्यात येणार होता. मात्र हे संशोधन अद्याप सुरू आहे.

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठ रुग्णालयातील डेव्हिड क्रिस्टेन्सेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गर्भधारणेत पॅरासिटामॉलचे सेवन केल्याने होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला. गर्भधारणेत वेदनाशामक म्हणून पॅरासिटामॉलचे सेवन केल्याने महिलेच्या प्रजननक्षमतेवरही काही प्रमाणात परिणाम होतो. मात्र जन्माला येणाऱ्या मुलीवर त्याचा गंभीर परिणाम होऊन प्रजननक्षमता कमी होते.

तीन अहवालांचा अभ्यास केल्यानंतर याविषयी संशोधन मांडण्यात आले आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय ठरू शकतो. मात्र तरीही या संशोधनाला पुष्टी मिळण्यासाठी आणखी काही बाबी स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे क्रिस्टेन्सेन म्हणाले. गरोदर महिलांनी कोणतेही औषध घेण्याआधी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असेही क्रिस्टेन्सेन म्हणाले.