17 December 2017

News Flash

लस व केमोथेरपीचा संयुक्त वापर मेंदूच्या कर्करोगात परिणामकारक

जीबीएम म्हणजे ग्लिओब्लास्टोमा हा फार आक्रमक कर्करोग असतो.

पीटीआय़, न्यूयॉर्क | Updated: April 18, 2017 1:54 AM

मेंदूचा कर्करोग

 

लस व केमोथेरपी या उपचारांच्या संमिश्र वापरातून मेंदूचा आक्रमक कर्करोग बरा करता येऊ शकतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील डय़ुक विद्यापीठातील संशोधकांनी ग्लिओब्लास्टोमा या मेंदूच्या कर्करोगाच्या ११ रुग्णांची पाहणी केली. त्यांना सीएमव्ही म्हणजे सायटोमेगॉलोव्हायरस अँटीजचे पीपी ६५ याशिवाय केमोथेरपी म्हणजे टेमोझोलोमाइड यांचे उपचार देण्यात आले होते. सीएमव्हीला जीबीएमचे जे आकर्षण असते त्यातून विषाणूतील ९० टक्के प्रथिने त्यात आविष्कारित होतात. जीबीएम म्हणजे ग्लिओब्लास्टोमा हा फार आक्रमक कर्करोग असतो. सीएमव्ही अँटीजेन पीपी ६५ वर मारा करणारी लस टेमोझोलोमाइडबरोबर दिली असता कर्करोग रुग्ण वाचण्याचे प्रमाण तुलनेने वाढते. ज्या रुग्णांना या दोन उपचार पद्धती संमिश्र पद्धतीने दिल्या त्यांच्यात चांगले परिणाम दिसून आले. टेमोझोलोमाइडचा डोस वाढवला असता यात प्रतिकाशक्ती वाढलेली दिसून आली. त्यात लिफोपेनियाची स्थिती निर्माण होते त्यात लस दिल्याने प्रतिकारशक्ती वाढते. क्लिनिकल कॅन्सर रिसर्च या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

First Published on April 18, 2017 1:54 am

Web Title: vaccine and chemotherapy joint use on brain cancer