20 November 2017

News Flash

Valentine’s day for boyfriend : मित्राला प्रपोज करायचंय तर मग हे वाचाच…

शेवटी जो आपल्यासाठी बनला आहे तो आपल्याला भेटणारच

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 21, 2017 4:36 PM

प्रत्येकाच्या मनात एखादी अशी व्यक्ती असते जिच्यासोबत आयुष्यभराची साथ मिळावी असेच वाटते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात व्हावं अशी मनात खूप इच्छा असते. पण, जर तो नाही म्हणाला तर? या भितीने इच्छा असूनही अनेकजणी आपल्या मनातल्या भावना कधी व्यक्तच करत नाहीत. मला जसं वाटतं तसंच त्यालाही वाटत असेल असं मानून त्यानेच मला प्रपोज करावं याचा अट्टाहास अनेकजणी करतात. त्यातच वेळ निघून जाते. पण आता जमाना बदललाय.. आता मुलीही त्यांच्या मनातल्या भावना मुलांसमोर न घाबरता बोलून दाखवतात. आज तर व्हॅलेंटाईन डे, त्यामुळे आज भूलचुक सगळं काही माफ असतं. तो मला हो बोलेल का?, त्याच्या मनात माझ्यासारख्याच भावना नसतील तर? आमची मैत्री तर तुटणार नाही ना? अशा एक ना अनेक प्रश्नांचं काहूर तुमच्या मनात माजणं स्वाभाविक आहे.

पण आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीबाबत त्याचे चांगले गुण त्याच्यासमोर न सांगता गप्पच राहतो. आजचा दिवस मात्र आपल्या प्रिय व्यक्तीचे गुणगाण गाण्याचाच आहे. त्यामुळे मनातले रुसवे फुगवे बाजूला ठेवून आपल्या प्रियकराला खूश कसं ठेवता येईल याकडेच मुलींनी लक्ष दिले पाहिजे.

प्रत्येकवेळा प्रियकरानेच पुढाकार घेऊन प्रपोज केले पाहिजे यापेक्षा या व्हॅलेंटाईनला तुम्हीच त्याला जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रपोज केलं तर.. कदाचित तो हो बोलेलही.. प्रयत्न करायला काय हरकत आहे…

मुलींनी या व्हॅलेंटाईन डेला हटके पद्धतीने प्रपोज करण्याचे हे काही फण्डेः

१. एखादे बाजारातले कार्ड घेऊन ते देण्यापेक्षा, स्वतः काही तरी लिहून बघा… कारण बाजारातले कार्ड हे काही आपल्या भावना स्पष्ट सांगू शकत नाहीत. स्वतःच्या हाताने लिहिलेले पत्र मात्र त्याला आपण खास असल्याची भावना नक्कीच देऊन जाईल. यातून तुम्ही त्यांच्यासाठी घेतलेली मेहनतही दिसून येईल.

२. मित्राला एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जाऊन तिथे गप्पा मारत असताना ‘इथे आपल्या दोघांच्या नावाचं घर असेल याबाबत तुला काय वाटतं?’ असा प्रश्न विचारा.. उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल.

३. तुमचा मित्र जर जास्तच रोमॅण्टिक स्वभावाचा असेल तर त्याला खऱ्या गुलाबाच्या फुलाच अंगठी ठेवून, गुडघ्यांवर बसून एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी प्रपोज करु शकता. जर त्यावेळी मावळत्या सूर्याची साथ असेल तर क्या बात…

४. थोडं अजूनच थरारक काही करायचे असेल आणि त्याचा प्रियकराला त्रास होणार नसेल तर थेट फेसबुकवर तुम्ही त्याला टॅग करुन आपल्या भावना मांडू शकता.

५. जर दिवसभर तुम्ही दोघेही व्यग्र असाल आणि एकमेकांसाठी पुरेसावेळ देता आला नसेल तर प्रियकराच्या किंवा ज्याला प्रपोज करणार आहात त्याच्या आवडत्या ठिकाणी रात्री वेळात वेळ काढून भेटा आणि आपल्या मनातल्या भावना अगदी समोरच बोलून टाका.

६. अनेकदा आपण कृत्रिम गोष्टींमध्ये इतके अडकून जातो की, समोरच्याला त्या गोष्टी आवडतात की नाही हेही लक्षात घेत नाहीत. जर तुमच्या मित्राला कार्ड, फूलं, मोबाइल मेसेज यांसारख्या गोष्टींपेक्षा तुमची साथ, भरपूर गप्पा यांची आवड असेल तर आज या सर्व गोष्टी ठरवून कराच. कारण एकत्र घालवलेले हे क्षण परत कधीच येणार नाहीत हे लक्षात ठेवा.

शेवटी जो आपल्यासाठी बनला आहे तो कधी ना कधी आपल्याला भेटणारच..  पण तो नेमका कोण हे पाहण्यासाठी प्रयत्न तर करावेच लागणार ना..

First Published on February 14, 2017 1:08 pm

Web Title: valentines day 2017 messages and how to propose boyfriend