नवरा बायकोतील वाद म्हणजे फार काही मोठे नाही. नात्यात गोडीगुलाबी असते तसेच थोडेसे खटके उडले तरच प्रेम टिकते आणि वाढते असे म्हणतात. तरुणांमध्ये व्हॅलेंटाइनचे सेलिब्रेशन सामान्य असले तरीही लग्नानंतरही नाते ताजेतवाने ठेवायचे असेल तर काही गोष्टी करायला हव्यात. आपल्या लाडक्या पत्नीला एखाद्या तणावातून बाहेर काढायचेच असा विचार करून रोहीतने जवळच्या एका फर्निचर स्टोअरला भेट दिली व जागेची बचत होईल असे फर्निचर खरेदी केले. फोल्डिंग खुर्च्या व टेबल्स, सोफा-बेड व एकात एक ठेवता येतील अशा खुर्च्या असे फर्निचर त्याने घेतले. यामुळे आता स्वाती तिच्या घरात तिला हवे तसे बदल वेळोवेळी करून घेऊ शकते. एखादी खोली जेव्हा लिविंग रूम म्हणून वापरायची असते तेव्हा ती त्यात तसे आवश्यक बदल करू शकते, आता तिला कमी जागेची चिंता वाटत नाही.

यावरुन व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेम व्यक्त करण्याचा दिवस नसून प्रेम, परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचाही दिवस आहे हेच या उदाहरणावरुन स्पष्ट होते. हा दिवस म्हणजे फक्त दोन प्रेमी किंवा पती-पत्नी यांच्यातील प्रेमाचा दिवस नसून आपल्या जोडीदाराप्रती वाटणारा आदर, सन्मान, सहजीवनात समानतेची जाणीव साजरी करण्याचा दिवस आहे. पूर्वी घर म्हणजे स्त्रियांची जबाबदारी असे मानले जायचे पण आज घरातील कामांची जबाबदारी पुरुष हिरीरीने स्वीकारताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षात भारतीय समाजात होत असलेल्या सुधारणेचे हे एक चिन्ह आहे. एका सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे की, घरातील फर्निशिंगच्या निवडी व खरेदीबाबतीत निर्णय घेण्यात भारतीय समाजात पुरुष आघाडीवर आहेत. याचे निर्णय पुरुषांनी घेण्याचे प्रमाण २४.९% तर स्त्रियांचे प्रमाण २३.१% आहे. यातील एक अतिशय महत्त्वाचे निरक्षण म्हणजे घरातील फर्निचरच्या डिझाईनबद्दलच्या निर्णयात पुरुष सहभागी होत असले तरी कपाटांच्या आत काय आहे याचे तपशील फक्त स्त्रियांनाच माहिती असतात.

एकमेकांना भेटवस्तू देण्यामागे खूप मोठा अर्थ असतो, वस्तू काय आहे यापेक्षा परस्परांविषयीच्या भावना त्यातून दिसून येणे जास्त महत्त्वाचे असते, हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. व्हॅलेंटाईन डेला फक्त भेटवस्तूंवर भर न देता आपले सहजीवन अधिक सुखी व आनंदी कसे होईल याकडे पाहिले जावे. पतीने आपल्या पत्नीविषयी कृतज्ञता, आदर व्यक्त करण्यासाठी, तिची काळजी आहे हे जाणवून देण्यासाठी केलेली अगदी छोटीशी कृतीदेखील त्यांचे सहजीवन आयुष्यभरासाठी समृद्ध करू शकते. छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या छोट्या कृतींमधून प्रेम, आदर प्रकट केल्याने परस्पर संबंध अधिक दृढ होतात. फुले किंवा चॉकलेट्स यासारख्या तात्पुरत्या उपायांपेक्षा दुसऱ्याला समजून घेऊन विचारपूर्वक केलेली छोटीशी कृती दुरावा मिटवू शकते.

अनिल सैन माथूर,

चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, गोदरेज इंटेरिओ