‘एनिथिंग इज गुड इफ इट्स मेड ऑफ चॉकलेट’ असा जो ब्रँड Jo Brand यांचा कोट आहे तसंच ‘एनिथिंग इज गुड इफ इट्स इनवॉल्व्स द नेम ऑफ हर’, असं मी म्हणेन. किंवा My Soul to Save मध्ये Rachel Vincent म्हणते त्याप्रमाणे “Chocolate says “I’m sorry” so much better than words.” सांगायचं झाल्यास “Her smile says “I’m sorry” so much better than words.” Clockwork Angel मधील Cassandra Clare चे “What kind of monster could possibly hate chocolate?” हे वाक्य तुझ्याबद्दल लिहायचे म्हणजे ते “What kind of monster could possibly hate You?” असे बरेच चॉकलेट संदर्भातले कोट्स आहेत तिथे मला तू दिसतेस. आता टिपीकल चॉकलेटप्रमाणे तू गोड आहेस असं मी म्हणणार नाही कारण स्तुती करणं वेगळं आणि खोटं बोलणं वेगळं असतं. म्हणून तू ना एखाद्या चॉकलेटसारखी नाहीयस. म्हणजे ‘इक्लियर्स’ सारखी बाहेरून टणक आतून हळवी आहेस. तर कधी ‘डेरिमिल्क’ सारखी वाटतेस थोडीशी प्रेमाची उब मिळाली की वितळली. तर कधी ‘स्कीनर्स’सारखी टॉमबॉय वाटतेस कधीही कुठेही कशीही अशाच पद्धतीची. तुला ट्रॅडिश्नल लूकमध्ये पाहिल्यावर लहानपणीच्या ‘किस मी’ चॉकटलेसारखे आठवणींच्या प्रवाहात वाहात जावंसं वाटतं. कधीकधी ‘हॅपिडण्ट’ सारखा डोक्याचा दिवसभर भूगा करतेस तू बडबड करुन करून. तर कधी परदेशी चॉकलेटप्रमाणे सप्राईज असतेस आतून काय आहे खालल्याशिवाय कळतं नाही तसंच मनात काय आहे बोलल्याशिवाय कळत नाही तशी. कधी ‘मँगो बाईट’, ‘हाजमोला’, ‘कच्ची कैरी’, ‘लिमलेट’सारखी प्रेडिक्टेबल असते. म्हणजे आवाजातील चढ उतरा नुसता फोनवर नाकाच्या धारा वर ओढल्याने समजतो. आजारी आहेस का? असं विचारल्यावर ‘नाही रे थोडं नाक वाहतंय’ किंवा ‘हा रे भेंडी सर्दी झालीय थोडी’ हे तुझं ठरलेलं उत्तर.

तू ना जरा लांबच राहात जा माझ्यापासून फॅमिली डॉक्टरने गोड वस्तुंपासून लांब राहा असा सल्ला दिलाय. म्हणजे थोडक्यात काय तर, तू माझ्या जवळ येऊन गप्पा मारू शकतेस. कारण बोलताना तुझ्यात काडीमात्र गोडवा जाणवत नाही. तुझ्या बोलण्याविषयी आता मी काही वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. हो पण, पण शांत बसणार असशील तर अजिबात येऊ नकोस माझ्या जवळ तू. कारण तेव्हा मात्र तू एखाद्या सोज्वळ बाळासारखी वाटतेस अगदी गोंडस आणि गोड… कोणीही भसकन पाय घरसून पडेल पातळ आणि लिबलिबीत झालेल्या डेरिमिल्कवरून पडतील तसं (चॉकलेट डे असल्याने मुद्दाम केळं नाही म्हणालो) अशीच वाटतेस.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी
friend request natak review
नाटयरंग : ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ – घटस्फोटित बाप-मुलीच्या नात्यातील उत्कट तेढ

कधीतरी मस्त मूडमध्ये चॉकलेट खाल्ल्यावर चॉकलेट हे जागातील सर्वात मस्त गोष्ट आहे असं वाटतं तसंच तुझ्याबरोबर गप्पा मारत बसल्यावर वाटतं, की ‘राव काय मस्तय हे सगळं…. आयुष्यात कसलंच टेन्शन नाहीय… जो पर्यंत ही पोरगी इथे आहे या पोराचं सगळं ऐकून घ्यायला…’ चॉकलेटबरोबर कधी असवस्थ वाटत नाही तसंच तुझ्याबरोबर गप्पा मारतानाही मी अगदी सुटतोच… कारण आपण कशावरही कितीही वेळ कधीही आणि कुठेही गप्पा मारू शकतो… अशी खूप कमी लोकं असतात आयुष्यात… माझ्या आयुष्यात तशा चौघीजणी पक्क्या आहेत (आई सोडून). सर्वांनाचा चॉकलेटची चव चाखता येते असं नसतं… त्यामुळेच माझ्या आयुष्याला गोडवा देणारी तू मला भेटलीस पण उशीरा भेटलीयस. मी नशिबवान आहे मला याची खात्री होती लहानपणापासून पण तुला भेटल्यापासून त्यावर शिक्कामोर्तब झालंय. उगच थोडी असला येड्याचा बाजार आपल्या आयुष्यात मांडून घेतं कोणी… चॉकलेटचे प्रकार असतात ना डार्क, साधं, रिच, व्हाईट आणि बरेचसारे तसे तुझेही आहेत.. म्हणजे हसतानाची तू, डोळ्यातलं पाणी टिपणारी तू, गप्पा मारता मारता डोळे मिचमिचवणारी किंवा पटकण टाळी देणारी तू… हे सगळं पॅकेज करून एक तू तयार होतेस… जी अन बिटेबल आहे…

चॉकलेट खाल्ल्यानंतर जी तृप्ती मिळते ना जिवाला ती सेम तुझ्याबरोबर गप्पा मारल्यावर टाइम स्पेण्ड केल्यावर मिळते. तुझ्याबरोबर बोलणं म्हणेज चॉकलेटची एखादी एनर्जी बार खाण्यासारखं असतं… मी भसक्कन चार्ज होतो… मला तुझ्याकडून सल्ल्याची अपेक्षा नसते पण किंम्मत विचारल्याशिवाय आई कसं चॉकलेट घेऊन देते लहान मुलांना तशी फिलिंग येतेय… म्हणजे तुला सांगितला ना मी प्रॉब्लेम चला झालं तर आता जरा हलकं हलकं वाटतंय आता रिकाम्या डोक्याने विचार करून अडचणीवर असं होतं ते… मी आत्तापर्यंत दोनच गोष्टींचा थोडा फार प्रमाणात व्यसनी आहे एक चॉकलेट कधीही कुठेही आणि दुसरी तुझी साथ…आणि हो तरीही मला संधी दिलीच की चॉकलेट आणि शलाकापैकी कोणाला एकाला निवड तर मी तुलाच निवडेल… जरी तुझ्या अती बावळटपणामुळे येणाऱ्या रिलेशनशिपमधल्या गोडव्याने मी मधूमेह होऊन मरेल याची खात्री असली तरी माझी पहिली निवड तूच असशील यात दुमत नाही… मला चॉकलेट आवडतात पण त्या चॉकलेटहून अधिक गोड मैत्रिण म्हणजे बीएफएफ माझ्या फ्रेण्ड लिस्टमध्ये आहे याचा जास्त अभिमान आहे…
Happy Chocolate Day…