व्हॅलेंटाइन विकचा सहावा दिवस म्हणजे किस डे. व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या दिवशी हा डे साजरा केला जातो. अनेक जण या दिवसाकडे प्रेमभावनेने पाहतात. तर, काहींना हा दिवस पोरखेळ वाटतो. परंतु, किस डे या दिवसाचं एक खास महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे किस या शब्दामागे एक विशेष अर्थदेखील आहे. त्यामुळेच या शब्दाचा नेमका अर्थ आणि त्या नावामागचा उगम कसा झाला हे जाणून घेऊयात.

किस (Kiss) हा शब्द जुन्या इंग्रजीमधील ‘सीसन’ (cyssan) या शब्दापासून जन्माला आला आहे. ‘सीसन’चा अर्थ होतो चुंबन घेणे. पण आता हा सीसन शब्द नेमका कुठून आला याची अचूक माहिती कोणालाच नसेल. परंतु, अनेकांच्या मते चुंबन घेताना लोक जो आवाज करतात त्यावरून या मूळ शब्दाची निर्मिती झाल्याचं म्हटलं जातं.

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
What Are The Seven Types Of Rest how to incorporate these types of rest In Your Life Follow This Tips ltdc
आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
Use coco peat to flower your home garden
घरातील बाग फुलवण्यासाठी वापरा कोकोपीट, घरच्या घरी कसे तयार करावे कोकोपीट

रोमन लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या चुंबनासाठी वेगवेगळे शब्द वापरले आहेत. जसे हात किंवा गालावर घेतलेल्या चुंबनाला बासीयम (basium) म्हणत तर चुंबन घेताना तोंड बंद केल्यास त्या चुंबनाला ऑस्कूलम (osculum) म्हणून संबोधले जात असे. तर उत्साहाने (उत्कट भावनेने) घेतलेल्या चुंबनाला सेव्हील्यूम (saviolum) म्हणून ओळखले जात असे.

ग्रीक भाषेमध्ये चुंबनासाठी शब्द नसला तरी प्रेमासाठी त्यांनी अनेक शब्द निर्माण केले. तुमच्या कुटुंबासाठी किंवा मित्रांसाठी असलेल्या निष्ठावान प्रेमासाठी फिलिया (Philia) शब्द ग्रीक लोक वापरत असत. तर दोघांमधील उत्कट प्रेमासाठी एरोस (eros) नावाने संबोधले जाई. मात्र एरोस हा शब्द एखाद्या व्यक्तीच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे थोर ग्रीक लेखक आणि विचारवंत प्लॅटोने सांगितले होते. तसेच खरे प्रेम हे शारिरीक आकर्षणावर आधारित नसते असेही प्लॅटो म्हणाले होते.

तर सर्वात शुद्ध आणि कोणताही हेतू मनात न ठेवता निस्वार्थी भावनेने केलेल्या प्रेमासाठी ग्रीक लोक अॅगॅपे (agape) हा शब्द वापरत. कुटुंब आणि खूप जवळच्या मित्रांवरील प्रेम हे अशा प्रकारचे असते असे ग्रीक तत्वज्ञान सांगते.

माहिती: ‘लिस्टवर्से डॉटकॉम’वरून