पुणे, नाशिक आणि सातारा या भागांत आढळलेल्या करोना विषाणूचे युरोपमधील विषाणूशी साधर्म्य आहे. करोनाचा उपप्रकार पुण्यातील ७८ टक्के, नाशिकमधील २३ टक्के नमुन्यांमध्ये आढळला आहे. तसेच या तिन्ही भागांमध्ये विषाणूचे वेगवेगळ्या पद्धतीने ‘म्युटेशन’ झाल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था (एनसीसीएस), लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने एप्रिल ते मे या कालावधीत १० ते ६० या वयोगटातील करोना बाधितांच्या ९० नमुन्यांचा संयुक्तपणे अभ्यास केला. त्या बाबतचे प्राथमिक निष्कर्ष बायो अर्काइव्ह या वैज्ञानिक संकेतस्थळावर देण्यात आले आहेत.

‘जैवतंत्रज्ञान विभागाच्या १००० जिनोम सिक्वेन्सिंग या प्रकल्पाचा भाग म्हणून हे संशोधन करण्यात आले. करोना विषाणूचे जगभरात वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी २०ए आणि २० बी हे दोन प्रकार आपल्याकडे आढळून आले आहेत. करोना विषाणूमध्ये विशिष्ट प्रकारचे बदल घडून आले आहेत. संशोधन केलेल्या पुणे, नाशिक आणि सातारा परिसरातील नमुन्यांमधून या तिन्ही भागात या विषाणूमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बदल झाले आहेत. लॉकडाउनमुळे नागरिक बाहेर फिरत नसल्याचा हा परिणाम असल्याचे जाणवते. तसेच त्याचे युरोपमधील विषाणूशी साधर्म्य असल्याचे आढळून आले आहे. करोना विषाणू कशा पद्धतीने पसरत आहे हे समजून घेण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून डॉ. शौचे यांनी करोना विषाणूचा आजार पसरणे, त्याची तीव्रता आणि धोका वाढणे या बाबत या संशोधनातून सध्या काही सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी
nagpur drug smuggling, drug smuggling uganda via doha marathi news
युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल

अधिक संशोधनाची गरज
या संशोधनाचा एकूण आवाका बराच मर्यादित स्वरूपाचा होता. मात्र, संशोधनातून समोर आलेल्या प्राथमिक निष्कर्षांमुळे या बाबत अधिक व्यापक संशोधनाची गरज आहे, असेही डॉ. शौचे यांनी नमूद के ले.