भाजीपालायुक्त आहारातील वापर हा घातक अशा प्रोस्टेट(मूत्राशयाच्या निमूळत्या भागावर असणारी ग्रंथी)वरील कर्करोगाची तीव्रता ३५ टक्क्य़ांनी कमी करत असल्याचा दावा ‘जागतिक कर्करोग संशोधन निधी’च्या नव्या संशोधनानंतर केला गेला असून दरवर्षी या कर्करोगामुळे १० हजारांहून अधिक लोक ठार होत आहेत.

कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा विद्यापीठाच्या संशोधकांनी पहिल्यांदाच २६ हजारांहून अधिक लोकांच्या आहाराचे मूल्यमापन केले. शाकाहारी, मांसाहारी आहार करणारे लोक यांचा अभ्यास केला गेला. प्रोस्टेट कर्करोग या आजाराला रोखण्यासाठी मिळालेल्या परिणामांमध्ये भाजीपाल्याचा आहार अधिक उपयुक्त असल्याचे दिसून आले. हा आहार सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचा असल्याचे द वेजन सोसायटीचे प्रवक्ते जिमी पिअर्स यांनी म्हटले आहे.

शाकाहारी असलेल्यामध्ये ‘प्रोस्टेट कर्करोग’ बळावण्याची शक्यता केवळ ३५ टक्के असल्याचे जागतिक कर्करोग संशोधनाला निधीतून अभ्यास करणाऱ्या एका गटाच्या कर्करोग नियंत्रणावरील संशोधनात म्हटले आहे.

इंग्लंडमध्ये ‘प्रोस्टेट कर्करोग’ हा सर्वसामान्यपणे आढळणारा आजार असून वर्षांला ४७ हजार नव्या रोगांची नोंदणी होत असते तर साधारण प्रत्येक वर्षी १० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू या आजारामुळे होत असतो. तसेच जागतिक स्तरावर फुफ्फुसाच्या कर्करोगानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा आजार म्हणून देखील सर्वश्रृत आहे.

संशोधनातून पहिल्यांदाच समोर आलेले निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत तसेच आहाराबाबतचे विविध पर्याय आणि प्रोस्टेट कॅन्सरच्या प्रार्दुभावाला रोखण्यात निच्छितच उपयुक्त ठरणारे आहेत. प्रार्दुभाव रोखणे महत्त्वाचे असून पुरुषांमध्ये मोठय़ा संख्येने फोफावणाऱ्या संख्येत घट करण्याचा प्रयत्न असल्याचे मत जागतिक कर्करोग संशोधन फंडातून हाती घेतलेल्या संशोधनाचे संचालक डॉ. पिनागोओटा मित्रौयू यांनी व्यक्त केले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)