उन्हाळ्यात पाचक अग्नी फार मंद असतो म्हणून सकाळी जेवणात जड, पाच्य व अजीर्णकारक पदार्थ मुळीच खाऊ नयेत. उन्हाळ्यात जेवण कमीच जातं. पाणी पिण्याकडेच जास्त कल असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात तसेच त्या कशा कराव्यात याविषयीची थोडक्यात माहिती.

दुधीभोपळा – सर्व ऋतूंतील आणि सर्व वयांतील लोकांना चालणारी ही भाजी. खूप पथ्यकारक आहे. पचायला सोपी आणि कोणत्याही व्याधीत खाऊ शकतो. हृदयविकारात अतिशय उपयोगी.

Stray animals suffering from dehydration due to heat 316 complaints in six days in Mumbai and Thane
उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
grape summer cooler juice recipe
Summer drink : उन्हाळ्यात थंडावा देईल ‘हे’ हिरवेगार सरबत! ‘या’ फळाचा करा वापर
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी

गवार – उन्हाळ्यात गवार खाल्ल्यानंतर काही जणांना पित्ताचा त्रास होतो.

कारले – कारले कडू, पण पथ्यकारक.

कोबी, प्लॉवर – उन्हाळ्यातच नव्हे तर अन्य ऋतूंतही बऱ्याच जणांना खाल्ल्यानंतर वाताचा
त्रास होतो.

भेंडी – मूतखडय़ाच्या रुग्णांनी कमी प्रमाणात खावी.

भाज्या बनवताना घ्यावयाची काळजी
– भाज्यांना तेल कमी प्रमाणात वापरावे, त्याचप्रमाणे मसाल्यांचा वापरही कमी असावा.
– भाजी ताजी असावी (बनवताना), तसेच भाजी बनवल्यानंतर ताजी असतानाच खावी.
– उन्हाळ्यात गरम मसाल्यांचा वापर कमीतकमी करावा.
– भाज्यांमध्ये आमसूल वापरावे, खूप जास्त पाण्यात भाज्या शिजवू नयेत.
– भाज्या डाळ घालून शिजवाव्यात. भाज्यांचे सूप बनवावे.
– भाज्या खाताना लिंबू जरूर वापरावे, जिरेपूड, धणेपूडचा वापर भाज्यांमध्ये करावा.
– भाज्या खूप दिवस फ्रिजमध्ये ठेवू नये.
– मिठाचा वापर आवश्यकतेनुसार करावा, जास्त प्रमाणात मीठ वापरू नये.

– डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com