भारताबरोबरच जगात इतरही देशात मोठ्या प्रमाणात महागाई असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दुधाची किंमत साधारण किती असेल असा तुमचा अंदाज आहे. ५० रुपये फारतर १०० किंवा महागात महाग २०० रुपये. पण व्हेनेझुएलामध्ये नागरीक एक बाटली दुधासाठी तब्बल ८४ हजार रुपये मोजत आहेत. याठिकाणी सर्वच गोष्टींची महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पण दुधाची किंमत तर गगनाला भिडली आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे तर जगणेच अवघड झाले आहे.

एका डॉलरची किंमत ८४००० बॉलिवर झाली असल्याने लोकांचे दैनंदिन व्यवहार अवघड झाले आहेत. याठिकाणी असणाऱ्या बॉलिवर या चलनाचे जागतिक बाजारातील मूल्य अतिशय कमी झाल्याने दुधासारख्या पदार्थांच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे म्हणणे आहे. आपल्याकडे पेट्रोल, डिझेल असेल किंवा दूध असेल यांच्या किंमती थोड्या वाढला तरी गदारोळ होतो. पण याठिकाणी वाढलेल्या महागाईचे प्रमाण ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. याठिकाणी महागाईचा दर आहे तब्बल ४००० टक्क्यांनी वाढला आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया, चीन आणि जपान देशांचे कर्ज या देशावर असल्याने देशांतर्गत व्यवहारही मोठ्या प्रमाणात थंडावले आहेत. एक डझन अड्यांची किंमत भारतीय चलनानुसार जवळपास १२ हजार असल्याने काही दिवसांतच याठिकाणच्या लोकांवर उपायमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. महागाईमुळे काळा बाजारही वाढला असून नागरिकांना आपल्या महिन्याच्या पगारात कुटुंबाचा केवळ खाण्याचा खर्च भागवणेही परवडेनासे झाले आहे. अशाप्रकाराने देश हादरुन गेला आहे.