28 September 2020

News Flash

Video Call साठी आकारला जातोय ISD कॉलचा दर ; मात्र ‘ही’ ट्रीक वापरल्यास होऊ शकतो फायदा

ट्रायनेही यासंदर्भात कंपन्यांसाठी सूचना जारी केलीय

फाइल फोटो (फोटो: एएफपी)

करोनामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन सुरु आहे. अनेक देशामधील कर्मचारी वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरुन काम करत आहेत. त्यामुळेच मागील काही महिन्यांपासून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र या व्हिडिओ कॉलिंगचा परिणाम आता मोबाइलच्या बिलांवर दिसून येत आहे. त्यामुळे आधीच वीज बिलांमुळे आर्थिक फटका बसलेल्या सामान्यांचा फोन बिलांमुळे खिसा आणखीन हलका झाला आहे. व्हिडिओ कॉलमुळे बील वाढू नये शकते याची ग्राहकांना पूर्ण कल्पना देण्यात यावी यासंदर्भातील सूचना ट्राय म्हणजेच टेलिफोन रेग्युरेट्री अथोरिटी ऑफ इंडियाने केल्या आहेत.

भारतामध्ये सध्या जिओ मीट, एअरटेल ब्लू जिन्स, गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांकडून व्हिडिओ कॉलिंगची सेवा पुरवली जाते. मात्र व्हिडिओ कॉलिंगमुळे बील वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच यासंदर्भात ग्राहकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ कॉल करताना अनेकदा सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून आयएसडी म्हणजेच आंतरराष्ट्रीय कॉलच्या दराने पैसे आकारले जातात. मात्र यासंदर्भात सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना योग्य पद्धतीने माहिती दिली जात नाही. व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्म आणि अॅप्लिकेशनवरुन आंतरराष्ट्रीय क्रमांकावर कॉल केल्यास त्यावर आयएसडीच्या दराने शुल्क आकारले जाते. डायरल इनच्या माध्यमातून कॉल केल्यास आयएसडी शुल्क आकारण्यात येते. मात्र हे शुल्क आकारले जाऊ नये म्हणून हे अॅप्लिकेशनचा डेस्कटॉप व्हर्जन वापरण्याचा पर्याय वापरता येऊ शकतो. मात्र यामध्येही सेल्युलर नेटवर्कशी कनेक्टेड क्रमांकावरुन फोन केल्यास आंतरराष्ट्रीय तसेच प्रिमयम क्रमांकावरील कॉलसाठी आय़एसडी शुल्क आकारले जाते.

मागील काही महिन्यांपासून फोनच्या बिलांमध्येही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यावरुन ग्राहकांना व्हिडिओ कॉलसाठी आयएसडी शुल्क आकारले जात असल्यासंदर्भात पुरेशी माहिती नसवी अशी शक्यता असल्याने ट्रायने कंपन्यांसाठी या सूचना जारी केल्या आहेत. ग्रहकांना आयएसडी दर आकारले जातील याची पूर्ण माहिती कंपन्यांनी देणं बंधनकारक असल्याचं ट्रायने म्हटलं आहे. सेवा देणाऱ्या टोलिकॉम कंपन्यांकडून आकारण्यात येणाऱ्या या आतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी स्मार्टफोनवरुन विडोओ कॉल करणे टाळावे. त्याऐवजी लॅपटॉपवरुन किंवा स्मार्टफोनवर घरातील वाय-फायवरुन व्हिडिओ कॉल करावेत. यामुळे बिलामध्ये बराच फरक दिसू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 5:11 pm

Web Title: video calling can attract isd charges what you should be careful about akp 94
Next Stories
1 सोरायटिक संधिवात म्हणजे काय? लक्षणे आणि उपाय
2 आता Paytm द्वारे करा शेअर्सची खरेदी-विक्री, लाँच झालं खास फीचर; जाणून घ्या डिटेल्स
3 लहान वयात मुलांना चष्मा लागतो? घ्या ‘ही’ काळजी
Just Now!
X