News Flash

आता नेटफ्लिक्सवरही खेळता येणार व्हिडिओ गेम; सब्सक्रिप्शन वाढवण्यासाठी कंपनीचा निर्णय

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वेब सिरीज आणि चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेटफ्लिक्सवर लवकर व्हिडिओ गेमही खेळता येणार आहेत.

Video games on Netflix
नेटफ्लिक्सवर आता व्हिडिओ गेम

यावर्षी २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांत, नेटफ्लिक्स ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनीच्या सब्सक्राइबर संख्या गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी वेगाने वाढली आहे. आता लोकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्स आपल्या व्यासपीठावर व्हिडिओ गेम्सची सुविधादेखील देणार आहे.मंगळवारी आपल्या निर्णयाची घोषणा करताना नेटफ्लिक्स म्हणाले की, सध्याच्या सबस्क्रिप्शन योजनेत व्हिडिओ गेमचे फिचर जोडले जाईल. त्यासाठी सब्सक्राइबरला कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तथापि, ही सेवा कधी सुरू होईल आणि नेटफ्लिक्स कोणत्या प्रकारचे खेळ विकसित करीत आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. कोणत्या प्रकारचे गेम्स असतील, हे फिचर कधी येणार आहे याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.

यावर्षी कंपनीने 55 लाख ग्राहक जोडले आहेत

नेटफ्लिक्सच्या आताच्या अर्निंग्स रिपोर्टनुसार एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत कंपनीत १.५  दशलक्ष ग्राहकांची भर पडली आहे. हे कंपनीच्या व्यवस्थापनाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे परंतु अलिकडच्या वर्षांच्या वाढीच्या दरापेक्षा बरेच कमी आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात, जानेवारी-जून २०२१ मध्ये कंपनीने ५.५ दशलक्ष ग्राहकांची भर घातली आहे. ही २०१३ पासूनची नेटफ्लिक्सची सर्वात वाईट कामगिरी आहे. २०१३ हा काळ होता जेव्हा नेटफ्लिक्स कंपनी ओरिजिनल प्रोग्राम आणण्याची तयारी करत होती. आता कंपनी व्हिडिओ गेमद्वारे आणखी एक मोठे पाऊल उचलत आहे. कंपनीने व्हिडिओ गेम एक्झिक्युटिव्ह माईक व्हर्डू नियुक्त केले आहे, ज्याचे काम या क्षेत्रात संधी शोधणे आहे.

मोबाईलसाठी आधी येणार गेम्स

नेटफ्लिक्सचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर ग्रेग पीटर्सच्या म्हणण्यानुसार कंपनीचे लक्ष सध्या मोबाईल गेम्सवर आहे. यानंतर हे गेम्स कंसोल्स आणि टीव्ही सेटवर देखील आणले जाईल. यावर्षी सब्सक्राइबर कमी गतीने जोडले गेले  असूनही, कंपनी जगातील सर्वात मोठी स्ट्रीमिंग सर्विस आहे. नेटफ्लिक्स या क्षेत्रात वॉल्ट डिस्ने, एचबीओ, अॅमेझॉन आणि अॅपलसह स्पर्धा करते. जून २०२१ पर्यंत नेटफ्लिक्सचे जगभरात २०.९ दशलक्ष सब्सक्राइबर आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2021 11:48 am

Web Title: video games can now be played on netflix the company decision to increase subscriptions ttg 97
Next Stories
1 वजन कमी करण्यासाठी करा ‘ही’ योग आसन!
2 आपल्या फोनमध्ये स्पायवेअर आहे किंवा फोन हॅक झाल्याचं कसं समजेल?
3 नुकत्यात लॉंच झालेल्या OnePlus Buds Pro चे भन्नाट फीचर्स; ३८ तासांची बॅटरी लाईफ आणि बरंच काही!
Just Now!
X