News Flash

घराच्या स्वच्छतेसाठी व्हिनेगरचा करा असा उपयोग

जाणून घ्या व्हिनेगरचे फायदे

घरामध्ये प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण हवं असेल तर घराची स्वच्छता राखणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपल्याला साफसफाई करण्याचा कंटाळा येतो. मात्र घरात स्वच्छता राखली नाही तर किटकांचं साम्राज्य पसरतं आणि त्यातूनच मग रोगराईला आमंत्रण मिळतं. त्यामुळे घराची स्वच्छता ही राखली गेलीच पाहिजे. मात्र अनेक वेळा घरात लहान मुलं असली की पसारा हा होतोच. तसंच बऱ्याच वेळा जमिनीवर एखादा पदार्थ पडला किंवा कोणतंही पेय सांडलं की त्याचे डाग तसेच राहतात. खूप प्रयत्न केल्यानंतरही ते डाग काढता येत नाहीत. अशामध्येच व्हिनेगर हे अत्यंत उपयोगी ठरतं.
बऱ्याच वेळा लोणचं, चटणी किंवा अन्य खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या व्हिनेगरचे दैनंदिन जीवनात बरेच फायदे आहेत. व्हिनेगरच्या वापरामुळे घर स्वच्छ करता येऊ शकतं. चला तर मग पाहुयात व्हिनेगरचे फायदे.

१. मुंग्यांपासून संरक्षण –
हिवाळा ऋतु सुरु झाला की घरात हळूहळू लाल किंवा काळ्या मुंग्या फिरतांना दिसतात. तसंच जमिनीवर एखादा पदार्थ जरी पडला तरी लगेच मुंग्या त्यावर येतात. मात्र या मुंग्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल तर त्यावर व्हिनेगर हे अत्यंत उपयोगी आहे. मुंग्यांना व्हिनेगरचा वास सहन होत नाही. त्यामुळे त्या पळ काढतात. यासाठी व्हिनेगरमध्ये समप्रमाणात पाणी घेऊन हे पाणी मुंग्या असलेल्या ठिकाणी शिंपडावे.

२. फरशी आणि फ्रिज साफ करण्यासाठी –
पाण्यात व्हाइट व्हिनेगर टाकून या पाण्याने जमीन आणि फ्रिज पुसून घ्यावा. त्यामुळे जमिनीवर किंवा फ्रिजमध्ये काही डाग पडले असतील तर ते लगेच निघतात. मात्र संगमरवर किंवा ग्रेनाइटची फरशी (लादी) असेल तर त्यावर व्हिनेगर टाकू नये.

३. अंडी उकडतांना-
बऱ्याचदा अंडी उकडत असताना ते मध्येच फुटतात. त्यामुळे अंड्यातील द्रव पाण्यात मिक्स होता. अशातच जर अंडी उकडण्यापूर्वी गरम पाण्यात व्हिनेगर टाकलं तर अंडी फुटत नाहीत.

४. चिकट आणि हट्टी डाग काढण्यासाठी –
कपड्यांवर एखाद्या तेलाचा किंवा ज्युसचा डाग पडला तर तो सहजासहजी निघत नाही. ना-नाविध उपाय केल्यानंतरही हे डाग निघत नाही. अशात व्हिनेगर उपयोगाला येतं. कपडे धुण्यापूर्वी अशा डागावर व्हिनेगर लावावं आणि थोड्यावेळ तसंच ठेवून द्यावं त्यानंतर हे कपडे धुवावेत.

५. फूलं ताजी राहण्यासाठी –
फुलांचा गुच्छ बराच वेळ ताजा राहण्यासाठी फुलदाणीमध्ये व्हाइट व्हिनेगर टाकावं. त्यामुळे फुले बरेच दिवस ताजी राहतात.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 2:20 pm

Web Title: vinegar for home remedies ssj 93
Next Stories
1 दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, इथे निघाली मेगाभरती
2 TATA ची नवी कार Altroz ; 21 हजारात बुकिंगला सुरूवात
3 BS-6 इंजिनसह Mahindra XUV 300 झाली लाँच, किंमतीत बदल
Just Now!
X