अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा सण येऊन ठेपला आहे आणि त्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. शॉपिंग असो, फराळ असो किंवा मग साफसफाई प्रत्येकजण या तयारीत गुंतला आहे. यंदाची दिवाळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे. विराटने सणासुदीच्या दिवसांतील त्याच्या फॅशनबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यासाठी निमित्त होतं ‘मान्यवर’च्या ‘इंडिया एथ्निक वीक’ या खास दिवाळीसाठी आखलेल्या मोहिमेचं.

‘धनत्रयोदशीपासून भाऊबीजपर्यंत दिवाळीचा संपूर्ण आठवडा मी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत साजरा करतो. दिवाळीच्या कितीतरी सुंदर आठवणी मी जपूर ठेवल्या आहेत. सणासुदीच्या दिवसांत पारंपरिक कपडे परिधान करणं मला आवडतं. कारण त्यामुळेच हे दिवस खास ठरतात असं मला वाटतं,’ असं विराटने सांगितलं. त्याचप्रमाणे या स्पेशल वीकसाठी शूट करताना परिधान केलेला रॉयल ब्ल्यू कुर्ता आणि सोनेरी नक्षीकाम असलेला जॅकेट फार आवडल्याचंही त्याने सांगितलं.

सोशल मीडियावर विराटने दिवाळीच्या पाचही दिवसांसाठी भारतीय पारंपरिक कपडे परिधान करण्याचं आवाहन केलं आहे. दिवाळी हा एका दिवसात संपणारा सण नव्हे तर त्याची तयारीही कितीतरी दिवस आधीपासून सुरू होते. दिवाळीचे हेच वैशिष्ट्य हा इंडिया एथ्निक विक या संकल्पनेमागचा विचार आहे. ‘इंडिया एथ्निक विक’ मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मान्यवर’ने मोहीम आखली आहे.