– डॉ. अजय केनी

औद्योगिकरण आणि फास्ट फूडच्या जमान्यामध्ये मनुष्य सकस आहार घेण्याचे विसरून गेलाय.सतत घेण्याचे विसरून गेलाय.सतत पुढे राहण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत मोकळ्या हवेत व्यायामच काय पण श्वास ज्ञानाचा घ्यायचा पण आपण विसरून गेलोय. लॉकडाऊनमुळे थोडा  जग थांबलाय.’कोरोना ‘ च्या हाहा:काराच्या बरोबर काही गोष्टी शांतपणे विचार करायची वेळ आलेली आहे.आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि हाडांच्या बळकटीसाठी ‘ड ‘ जीवनसत्वची अत्यंत जरुरी असते.त्वचेवर मुबलक ऊन पडल्यास त्वचा ”ड”  जीवनसत्व  तयार करू शकते पण लोकडाऊनमुळे घराबाहेर पडायची बंदी मग अंगावर ऊन कसे पडणार ? भारतासारख्या विकसनशील देशामध्ये ”ड”  जीवनसत्वाची कमतरता खूपच दिसून येते त्यामुळे हाडांच्या बरोबर प्रतिकारशक्ती, मेंदूचे आजार, डायबेटीस , हृदयविकार इत्यादी विकारांमध्ये त्याचा अभाव आढळून येतो.

भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशाला ऊन भरपूर असूनही देशात ‘ ड ‘ जीवनसत्वाची कमतरता खूप प्रमाणात आढळते त्यामुळे दिवसा उन्हात बसणे हा अगदी साधा सोपा स्वस्त उपाय आहे. जर शक्य झाल्यास साधारण १५ ते ३० मिनिटे सकाळच्या उन्हात बसावे. गोऱ्या लोकांच्यापेक्षा सावळया  लोकांना जास्त वेळ बसावे लागत नाही पण त्वचा उन्हाने भजनर न्हे त्याची मात्र काळजी  घ्या . आपल्या प्रदेशातील  UV index जर समजला तर बरे तो जर ३ च्या खाली असेल तर त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. सकाळी ११ ते ३ पर्यत UV index जास्त असतो.   पण ज्यांना उन्हात बसने शक्य नाही त्यांनी काय करावे इथे मासांहारी लोकांची त्यातल्या त्यात मासे खाणाऱ्या लोकांची चैनी आहे असे म्हणता येईल. शक्योतो समुद्रातील मासे “ड ” जीवनसत्व मुबलक प्रमाणात देऊ शकतात.रावस,बांगडा इत्यादी मासे, शिंपले, कोळंबी इत्यादी seafood खाल्यास “ड ” जीवनसत्व मिळू शकते. या माशामध्ये omega ३ fattu acid ही असते.  जे हृदयासाठी चांगले समजते जाते.

तुम्ही Eggiterian असाल तर “ड ” जीवनसत्व अंड्यातील yolk म्हणजे पिवळे बलक सुद्धा खालले तरी चालेल. पण तुम्हाला cholesterolचा धोका असेल तर अंड्यातील पिवळे बलकजरा जपून खा. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा. मग शाकाहारी व्यक्तींनी काय करावे ?तुमहाला आवडत नसेल तर ओळबी (मशरूम) खाल्यास  त्यातून “ड ” जी वनसत्व मिळू शकते. मनुष्याप्रमाणेच उन्हापासून ओळबी “ड ” जीवनसत्व तयार करतात. पण तुमच्या विश्वासू दुकानदाराकडूनच  ओळबी खरेदी करा. काही ओळबीच्या शरीराला  वास  येऊ शकतो.

अलीकडे मार्केटमध्ये Vit  D fortified उत्पादने मिळू लागली आहेत. उदाहरणार्थ :- दूध, सोयाबीनचे दूध, संत्रीचा रस , तृणधान्ये,काही दह्याचे प्रकार (yogurt ) ,टोफ़ू. मात्र त्यांच्या वेष्टनावरील जीवनसत्वावरील fortification आहे हे खात्री करूनच हे खाद्यप्रकार खरेदी करा. हे सगळे करण्यापेक्षा एखादी गोळी सांगा ना सगळंच किती सोपं होईल.”ड ” जीवनसत्वच्या कॅप्सूल पावडर, इंजेकशन उपलब्ध आहेत.पण त्यांची गरज आणि डोससाठी तुम्हाला डॉक्टरांची गरज भासेल. डॉक्टर तुमच्या रक्तातील Vit D तपासतील आणि आवश्यकतेनुसार तुम्हाला  Vit Dचा डोस देऊ शकतील. कारण कुठल्याही औषधाचा अतिरेक झाल्यास त्याचे दुषपरिणाम होतात.त्यामुळे  Vit Dची औषधे खाण्यापूर्वी कृपया डॉक्टरचा सल्ला घ्या.

त्यामुळे काळजी करू नका. मस्त राहा लॉकडाऊनमध्ये स्वतःला Rewind करा. आपल्यातल्या कमतरता शोधा.त्यांचे उपाय शोध. दबलेले छंद बाहेर काढा. भरपूर विश्रान्ति घ्या. आणि लॉकडाऊन संपल्यानंतर नवीन ऊर्जेने जगाला सामोरे जा. सूर्यप्रकाशात बसताना घ्यावयाची  काळजी सकाळी ११ च्या आधी किंवा दुपारी ३ नंतर बसावे. १५ ते ३० मिनिटे पुरी आहेत. शरीराचा जास्तीत जास्त भाग सूर्यप्रकाशाच्या टप्प्यात यावा. गोऱ्या लोकांनी कमी वेळ बसावे. त्वचा लाल होणे ,खाज येणे, दुखणे इत्यादी लक्षणे दिसल्यास सूर्यप्रकाशातुन निघून सावलीत यावे. ती लक्षणे sunburn मुळे दिसू शकतात. UV पासून डोळे सांभाळावे. गॉगल वापरलेला चांगला. तुमच्या गावाचा UV index जाणून घ्या. ‘ड ‘जीवनसत्वाने कोरोना व्हायरसचा प्रतिकार होतो असा अनुभव नाही पण Vit D ने प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते.

(लेखक पल्मोनॉलॉजिस्ट व क्रिटिकल केअर एक्स्पर्ट, अॅस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर आहेत)