व्हिवो ने भारतात Vivo Y72  हा एक नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नवीन लॉन्च केलेला Vivo Y72 5G मध्ये ८  जीबी रॅम + १२८  जीबी इंटर्नल स्टोरेज आहे आणि याची किंमत २०,९९० रुपये एवढी आहे. फोन ४ जीबी पर्यंत एक्सपेंडेबल रॅमसह येतो. Vivo Y72 5G भारतात १५  जुलैपासून व्हिव्हो इंडिया ई-स्टोअर, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटाक्लिक, बजाज ईएमआय स्टोअर वर उपलब्ध होईल. प्रिझम मॅजिक आणि स्टॅटिक ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये स्टोअरमध्ये हा फोन मिळेल. लाँच ऑफरचा एक भाग म्हणून Vivo Y72 5G स्मार्टफोन खरेदी करण्यामध्ये इंटरेस्ट दाखविणाऱ्या ग्राहकांना एचडीएफसी बँक कार्डवरती १५०० रुपयांपर्यंतचे कॅशबॅक आणि एक वेळ स्क्रीन बदलून मिळू शकते. नव्याने लाँच झालेला Vivo Y72 हा फोन चीनी स्मार्टफोन एमआय ११ लीत, रेडमी नोट १० प्रो मॅक्स अशासारख्या इतर फोनला टक्कर देणारा आहे.

Vivo Y72 5G ची वैशिष्ट्ये

Vivo Y72 5G  मध्ये ६.५८ इंच एफएचडी + इनसेल डिस्प्लेसह २४०० × १०८० स्क्रीन रिझोल्यूशन आणि उच्च ९० एचएच आहे.  व्हीवो फोनचे पॉवर बटन साइड माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर म्हणून देखील कार्य करते. कंपनीनुसार डोळ्यांनीसुद्धा हा फोन अनलॉक करता येऊ शकतो. यामध्ये ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि २ मेगापिक्सलच्या पोर्ट्रेट लेन्ससह ड्यूल रेअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये सुपर नाईट मोड, पर्सनलाइज पोर्ट्रेट्स, व्हिडिओ कॉलसाठी फेस ब्युटी आणि सुपर एचडीआर यासह अनेक कॅमेरा वैशिष्ट्ये आहेत. पुढच्या बाजूस फोनमध्ये ८  मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बॉक्समध्ये १८ डब्ल्यू फ्लॅश चार्जसाठी सपोर्टसह ५०००  एमएएच बॅटरीसह फोन येतो. Vivo Y72 मध्ये अल्ट्रा गेम मोड देखील आहे ज्यात 4D गेम वायब्रेशन, एस्पोर्ट्स मोड, मल्टी टर्बो ५.० आणि आणखी काही फीचर्स आहेत.

smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
car charging point
वसई विरार शहरात चार्जिंग केंद्र उभारणार
sensex and nifty markets news
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्याहून अधिक पडझड; नेमके कारण काय?

या फोनबद्दल कंपनी सांगते “बाकीच्या व्हीवो फोनप्रमाणेच Y72 हे मॉडेल ‘मेक इन इंडिया’ बद्दलच्या विवोच्या बांधिलकीचे पालन करते.