आम्ही कायमच बदलांच्या शोधात असतो आणि चांगलं काहीतरी शोधत असतो. मात्र हा शोध कधीही पूर्ण होत नाही. अधिक पैसे खर्च न करता अगदी कमी किंमतीत तुम्हाला अत्याधुनिक फिचर्स असलेला फोन मिळू शकतो का? चला जाणून घेऊया.

परवडणारी किंमत आणि वापरकर्त्यांचा अनुभव हे आज स्मार्टफोन उद्योगावर अधिराज्य गाजवत आहेत. आज स्मार्टफोन हे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग झाले आहेत. आज आपण अशा स्मार्टफोनच्या शोधात असतो ज्यामध्ये आपल्याला आवश्यक सर्वकाही उपलब्ध असेल. उत्तम परफॉर्मन्स आणि स्टाईल या दोन्हीचा मेळ घालून विवो एस 1 हा सध्या सर्वांच्या भेटीला येत आहे.

पॅनोरामिक डिस्प्ले
नव्याने विवोच्या कुटुंबात सामिल झालेल्या विवो एस 1 मध्ये symmetrical Halo FullView™ Display देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 6.38 इंचाचा Full HD+ Super AMOLED डिस्ल्पे देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त 1080*2340 पिक्सेलचे रिझॉल्युशन देण्यात आले आहे. वरील भागात ड्यूड्रॉप नॉचदेखील देण्यात आली आहे. तसेच यामध्ये Flash In-Display फिंगरप्रिंट स्कॅनरही देण्यात आला आहे.

उत्कृष्ट प्रतिचा कॅमेरा

विवो S1 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यामध्ये एफ/ 1.78 अपर्चरसह 16 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, एफ/ 2.2 अपर्चरसह वाला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंट पॅनलवर एफ/ 2.0 अपर्चरसह 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमरा देण्यात आला आहे. फुल स्क्रिन डिस्प्लेचा फायदा मिळवण्यासाठी कॅमेऱ्याची टेक्नॉलॉजी डिझाइन करण्यात आली आहे.

मनमोहक रंग
मागील बाजूस देण्यात आलेला ट्रिपल रिअर कॅमेरा हिच केवळ या स्मार्टफोनमधील लक्षवेधी बाब नाही. याशिवाय निरनिराळ्या रंगांमध्ये येणारे प्रामुख्याने बॅक पॅनलवरील ग्रेडीअंट कलर्समुळे मोबाइल अधिक आकर्षक दिसतो. हा स्मार्टफोन सध्या डायमंड ब्लॅक आणि स्कायलाइन ब्लू या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

असाधारण कामगिरी
मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसरसोबत येणारा विवो S1 हा भारतातील पहिला मिडरेंज स्मार्टफोन आहे. यामध्ये Octa-core MediaTek Helio P65 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 4GB+128GB, 6GB+64GB and 6GB+128GB या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली असून 18W Dual-Engine फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचाही वापर करण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर हा फोन 24 तासांपेक्षा अधिक बॅटरी बॅकअप देणार आहे. तसेत यामध्ये Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/A-GPS आणि Micro-USB with USB OTG सपोर्टही देण्यात आला आहे.

उत्तम गेमिंग एक्सपिरिअन्स
जोपर्यंत गेमिंगचा प्रश्न आहे, या डिव्हाइसमध्ये बहुतांश गेम्सचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. तसेच गेमच्या प्रेमिंसाठी यामध्ये Ultra Game Mode देखील देण्यात आला आहे.

नवा ऑलराऊंडर
विवो S1 मध्ये अन्य मोबाइलप्रमाणे पारंपारिक नॉट डिस्प्ले देण्यात आला नसून त्याऐवजी एक ड्रॉप नॉच देण्यात आला आहे. तसेच यामध्ये ऑनस्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. मिडरेंज फोनमध्ये देण्यात आलेल्या अशा अनेक नव्या फीचर्समुळे खऱ्या अर्थाने हा स्मार्टफोन ऑलराऊंडर ठरतो. सध्या हा स्मार्टफोन ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. विवो कायमच मिडरेंज सेगमेंटमध्ये प्रिमिअम फिचर्स देत आले आहे. विवो S1 हा भारतात 7 ऑगस्टला लॉन्च करण्यात आला असून याच्या सुरूवातीच्या व्हेरिअंटची किंमत 17,990 रूपये, तर 6GB+64GB इंटरनल मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमक 18,990 रूपये तर 6GB+128GB इंटरनल मेमरी असलेल्या व्हेरिअंटची किंमत 19,990 रूपये असेल.