Vivo कंपनीने भारतात आपल्या नव्या U सिरीजचा पहिला स्मार्टफोन U10 लाँच केला आहे. दिल्लीमध्ये एका इव्हेंटमध्ये कंपनीकडून हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या मागील बाजूला तीन कॅमेऱ्यांचा अर्थात ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलं आहे.
केवळ ऑनलाइन पद्धतीनेच या फोनची विक्री होईल, Amazon इंडियाच्या संकेतस्थळावरुन हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

हा फोन इलेक्ट्रिक ब्ल्यू आणि थंडर ब्लॅक अशा दोन कलर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 एआयई एसओसी प्रोसेसरचा वापर यात करण्यात आला आहे. विविध तीन व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून यातील 3GB रॅम + 32GB स्टोरेज क्षमतेच्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. तर, 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज क्षमतेचं दुसरं व्हेरिअंट असून 9 हजार 999 रुपये इतकी याची किंमत आहे. याशिवाय, 4GB रॅम + 64GB स्टोरेज क्षमतेच्या व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये इतकी आहे. 29 सप्टेंबरपासून या फोनच्या विक्रीला सुरूवात होईल.

आणखी वाचा : Google ने सहा ‘धोकादायक’ अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले; तुम्हीही तातडीने करा डिलिट

फीचर्स –
ड्युअल-सिमकार्डचा सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन अँड्रॉइड 9 पाय(9.1 फनटच) या ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असेल. यामध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉचसह 6.35-इंच HD+ डिस्प्ले आहे. यात विशेष अल्ट्रा गेमिंग मोड फीचर असून याद्वारे गेमिंगचा दर्जेदार अनुभव मिळेल. यामध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज असून इंटर्नल मेमरी कार्डद्वारे 256GB पर्यंत स्टोरेज वाढवता येणं शक्य आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या मागील बाजूला LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 13 मेगापिक्सल क्षमतेचा मुख्य कॅमेरा तर 8 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे अन्य दोन कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेराही आहे. सेल्फी कॅमेऱ्यात AI फेस ब्यूटी आणि फेस अनलॉक यांसारखे फीचर्सही आहेत. फोनमध्ये तब्बल 5,000mAh क्षमतेच्या दर्जेदार बॅटरीचा वापर करण्यात आला आहे.