Vivo ने काही दिवसांपूर्वीच Vivo V11 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. या फोनची विक्रीपूर्व नोंदणी देखील सुरू करण्यात आली होती. अखेर आजपासून या फोनची विक्री सुरू झाली आहे. विवोच्या सर्व स्टोअर्सवर आणि ऑनलाइन पद्धतीने शॉपींग पॉर्टल्सवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 25 हजार 990 इतकी या फोनची किंमत आहे.

हा फोन खरेदी केल्यास अनेक आकर्षक ऑफर्सही दिल्या जात आहेत. यानुसार एचडीएफसीच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने हा फोन खरेदी केल्यास 2 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. जिओच्या ग्राहकांसाठी 4,050 रुपये कॅशबॅक आणि मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटीची ऑफर आहे. पेटीएम मॉलवरुन हा फोन खरेदी केल्यास 2 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

अँड्रॉईड ओरियो फन टच ओएस सिस्टिमवर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच सुविधा देण्यात आली आहे. तसंच, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर आणि ग्रेडियंट डिझाईन आहे. V11 Pro मध्ये 6.41 इंच आकाराची फुल एचडी स्क्रीन, 660 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आहे. फोनमध्ये 12 आणि 5 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीप्रेमींसाठी 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3400mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.