01 June 2020

News Flash

सहा कॅमेऱ्यांचा Vivo V17 Pro झाला स्वस्त, जाणून घ्या नवी किंमत

दोन पॉप-अप सेल्फी कॅमेरे असलेला हा जगातील पहिलाच स्मार्टफोन असल्याचा दावा

स्मार्टफोन निर्माती कंपनी Vivo ने महिन्याभरापूर्वीच भारतात लाँच केलेला स्मार्टफोन Vivo V17 Pro च्या किेंमतीत कपात केली आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल क्षमतेचा ड्युअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. दोन पॉप-अप सेल्फी कॅमेरे असलेला हा जगातील पहिलाच स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यातील एक कॅमेरा 32 मेगपिक्सल क्षमतेचा, तर दुसरा 8 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. एकूण सहा कॅमेरे या स्मार्टफोनमध्ये आहेत.

कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 –
Vivo V17 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. तसंच यामध्ये ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6’ चा वापर करण्यात आला आहे. 4,100 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये 6.44 इंचाचा सुपर एमोलेड फुल HD+ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ग्लेशियर ब्ल्यू आणि मिडनाइट ओशिअन कलरमध्ये उपलब्ध असेल. Android 9 Pie वर आधारित हा स्मार्टफोन Funtouch OS 9 वर कार्यरत असेल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर देखील आहे.

किंमत –
दोन हजार रुपयांची कपात झाल्याने 27,990 रुपयांना Vivo V17 Pro खरेदी करता येईल. लाँचिंगवेळी याची किंमत 29 हजार 990 रुपये होती. ही किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. Vivo V17 Pro मध्ये मागील बाजूला असलेल्या चार कॅमेऱ्यांपैकी मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. यामध्ये AI सुपर नाइट मोड हे फीचर देखील आहे. याशिवाय मागील बाजूचे अन्य कॅमेरे अनुक्रमे 13, 8 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 5:01 pm

Web Title: vivo v17 pro price cut in india know all features and price sas 89
Next Stories
1 SBI च्या कोट्यवधी खातेदारांना झटका, एक नोव्हेंबरपासून ‘हा’ महत्त्वाचा बदल
2 Truecaller देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर; सुरू केलं नवं फीचर
3 आता येतोय Motorola चा फोल्डेबल फोन, 13 नोव्हेंबरला होणार लाँच
Just Now!
X