News Flash

Vivo V17 Pro लाँच , दोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यांसह जगातला पहिला फोन

तब्बल 32 मेगापिक्सल क्षमतेचा ड्युअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा, तर मागील बाजूलाही चार कॅमेऱ्यांचा सेटअप

स्मार्टफोन निर्माती कंपनी Vivo ने भारतात आपला नवा स्मार्टफोन Vivo V17 Pro लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल क्षमतेचा ड्युअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. दोन पॉप-अप सेल्फी कॅमेरे असलेला हा जगातील पहिलाच स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यातील एक कॅमेरा 32 मेगपिक्सल क्षमतेचा, तर दुसरा 8 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. 20 स्पटेंबरपासून अर्थात आजपासून या स्मार्टफोनसाठी प्री-बुकिंग सुरू झालं आहे. तर, 27 सप्टेंबरपासून यासाठी विक्रीला सुरूवात होईल.

किंमत –
29,990 रुपये इतकी Vivo V17 Pro ची किंमत निश्चित करण्यात आली आहे. ही किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. Vivo V17 Pro मध्ये मागील बाजूला असलेल्या चार कॅमेऱ्यांपैकी मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल क्षमतेचा आहे. यामध्ये AI सुपर नाइट मोड हे फीचर देखील आहे. याशिवाय मागील बाजूचे अन्य कॅमेरे अनुक्रमे 13, 8 आणि 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत.

ऑफर –
8 ऑक्टोबर 2019 पर्यंत Vivo V17 Pro खरेदी केल्यास वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफर आहे. तर, HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक मिळेल.

कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 –
Vivo V17 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. तसंच यामध्ये ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6’ चा वापर करण्यात आला आहे. 4,100 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये 6.44 इंचाचा सुपर एमोलेड फुल HD+ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ग्लेशियर ब्ल्यू आणि मिडनाइट ओशिअन कलरमध्ये उपलब्ध असेल. Android 9 Pie वर आधारित हा स्मार्टफोन Funtouch OS 9 वर कार्यरत असेल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर हे फीचर देखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:42 pm

Web Title: vivo v17 pro with dual pop up selfie cameras launched in india know price specifications and all offers sas 89
Next Stories
1 Redmi K20 Pro Premium Edition लाँच, स्नॅपड्रॅगन 855 प्लस प्रोसेसरचा सपोर्ट
2 पितृपक्ष म्हणजे काय?
3 ‘हीरो-यामहा’ची भागीदारी, लाँच केली शानदार ‘इलेक्ट्रिक सायकल’
Just Now!
X