चीनच्या Vivo कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Vivo V17 लाँच केला आहे. कंपनीने हा फोन सर्वात आधी रशियात लाँच केला होता. 22 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत असून केवळ एकाच व्हेरिअंटमध्ये(8GB रॅम आणि 128GB स्टोरेज ) हा फोन उपलब्ध असेल. या फोनसोबत एक हजार 999 रुपयांचे Vivo XE710 इअरफोन मोफत मिळतील. या फोनसाठी आगाऊ नोंदणीला सुरूवात झाली असून 17 डिसेंबरपासून फोनच्या विक्रीला सुरूवात होईल. हा स्मार्टफोन मिडनाइट ओशिअन आणि ग्लेशिअर आइस अशा दोन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे.

Vivo V17 च्या मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप अर्थात 4 कॅमेरे आहेत. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये फुल स्क्रीनसह पंच होल डिस्प्ले आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात सुपर नाइट सेल्फी (Super Night Selfie) मोड आहे. Super Night Mode द्वारे रात्रीसुद्धा उत्तम फोटो काढता येतील असं विवोने सांगितलं आहे. तसंच फोनच्या मागील बाजूलाही सुपर नाइट मोड आहे. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी असून 18W फास्ट चार्जिंग दिलेलं आहे.

आणखी वाचा- दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप, बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लाँच

Vivo V17 मध्ये 6.44 इंची FullHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. AMOLED डिस्प्ले फोनमध्ये डिस्प्ले खालीच फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. क्वालकॉमचा Snapdragon 675 प्रोसेसर देण्यात आला असून 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिलेलं आहे. Android 9 Pie आधारित FunTouchOS 9.2 चा या फोनमध्ये समावेश आहे. काही दिवसात विवो त्यांची नवी ओएस सादर करत असून त्यानंतर अपडेटद्वारे Android 10 या फोनमध्ये वापरता येईल.