Vivo कंपनीचा शानदार स्मार्टफोन  Vivo V19 आता स्वस्त झाला आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत जवळपास 4 हजार रुपयांची कपात केली आहे. मे महिन्यात भारतात लाँच झालेल्या Vivo V19  स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात दिलेला ड्युअल होल-पंच सेल्फी कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 712 चिपसेट प्रोसेसर.

फीचर्स:-
Vivo कंपनीचा हा फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज अशा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. पियानो ब्लॅक आणि मिस्टिक सिल्वर असे दोन कलरचे पर्याय या फोनसाठी आहेत. डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 6.44 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2400 पिक्सल) सुपर अॅमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंन्सर फोनमध्ये देण्यात आले असून लो ब्राइटनेस अँटी-फ्लिकर हे फीचरही आहे. Vivo V19 हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित Funtouch OS 10 वर कार्यरत असेल. Vivo V19 मध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसरसह 8 जीबी रॅम आहे. इनबिल्ट स्टोरेजसाठी 128 जीबी आणि 256 जीबी असे दोन पर्याय आहेत.

कॅमेरा :-
Vivo V19 च्या मागील बाजूला क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. तर, अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे आहेत. रिअर कॅमेऱ्यामध्ये सुपर नाइट मोड, अल्ट्रा-स्टेबल व्हि़डिओ, आर्ट पोर्ट्रेट व्हि़डिओ, सुपर मॅक्रो आणि बोकेह पोर्ट्रेट हे फीचर्स आहेत. फोनच्या पुढील बाजूला 32 मेगापिक्सलचा प्रायमरी सेल्फी कॅमेरा आहे. तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेऱ्यात सुपर नाइट सेल्फी, सुपर वाइड-अँगल सेल्फी, अल्ट्रा स्टेबल व्हिडिओ यांचा समावेश आहे. अशाप्रकारे एकूण सहा कॅमेरे या फोनमध्ये आहेत. याशिवाय Vivo V19 मध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4,500 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, ब्लूटूथ 5.0, 2.4 गीगाहर्ट्ज़ आणि 5 गीगाहर्ट्ज़ ड्युअल बँड वाय-फाय आणि जीपीएस सपोर्ट यांचा समावेश आहे.

किंमत :-
कंपनीने 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट असलेल्या Vivo V19 च्या किंमतीत तीन हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे याची किंमत आता 27,990 रुपयांऐवजी 24,990 रुपये झाली आहे. तर,  8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किमतीत जवळपास चार हजार रुपयांची कपात झाली असून हा फोन आता 27,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.