Vivo कंपनीने दोन दिवसांपूर्वीच आपला नवीन स्मार्टफोन Vivo V20 Pro भारतात लाँच केला. या फोनची खासियत म्हणजे यामध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसरचा सपोर्ट आहे. हा सर्वात स्लीम 5G स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Vivo V20 Pro किंमत :-

Vivo V20 Pro यापूर्वी सप्टेंबर महिन्यात थायलंडमध्ये लाँच झाला होता. कंपनीने हा फोन भारतात एकाच व्हेरिअंटमध्ये (8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज) आणला आहे. मिडनाइट जॅज आणि सनसेट मेलोडी अशा दोन कलर्सच्या पर्यायात फोन खरेदी करता येईल. अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असलेल्या या फोनची किंमत 29,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Vivo V20 Pro स्पेसिफिकेशन्स :-
Vivo V20 Pro मध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित Funtouch OS 11 चा सपोर्ट आहे. फोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले असून फोटोग्राफीसाठी यामध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत. यातील 64 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक 2 मेगापिक्सेलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 44 मेगापिक्सेल क्षमतेचा मुख्य कॅमेरा आणि त्यासोबत 8 मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सरही मिळेल.

Vivo V20 Pro बॅटरी :-
या फोनमध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5G, 4G LTE, 3.5एमएमचा हेडफोन जॅक आणि युएसबी टाईप-सी पोर्ट मिळेल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही आहे.