Vivo कंपनीने आपल्या लेटेस्ट V २० सीरीजमधील नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. V20 आणि V20 Pro नंतर अफॉर्डेबल मॉडल म्हणून Vivo कंपनीने V20 SE हा स्मार्ट लाँच केला आहे. Vivo ने याच आठवड्यात व्ही २० सीरीज लाँच केली होती. या सीरीजमध्ये आता V20 SE हा स्मार्ट आणला आहे. या फोनचं खास वैशिष्टय म्हणजे यामध्ये वॉटरड्रॉप स्टाइल डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. शिवाय हा स्मार्टफोन ३डी डिझाइन बॅकसह ३३ वॉट फास्ट चार्जिंग ऑफर करतो.

Vivo कंपनीने V20 SE हा नवीन स्मार्टफोन सध्या फक्त मलेशियात लाँच केला आहे. मलेशियामध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या स्मार्टफोनची किंमत 1,199 MYR (जवळपास 21,300 रुपये) असणार आहे. हा स्मार्टफोन Lazada Malaysia वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. भारतीय बाजारापेठेत हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.

cholesterol levels
‘हा’ एक ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी; फक्त सेवनाची पद्धत एकदा डाॅक्टरांकडून जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Can those on insulin participate in exercise
व्यायामापूर्वी खावे की नंतर? मधुमेही व्यक्तीने व्यायाम करावा का? व्यायाम करताना काय काळजी घ्यावी, डॉक्टरांकडून जाणून घ्या
Clean stained sheets without a washing machine
वॉशिंग मशिनशिवाय मळलेल्या चादरी कशा कराव्या साफ, जाणून घ्या सोप्या टिप्स

फीचर्स आणि वैशिष्ट्ये
ग्रेविटी ब्लॅक आणि ऑक्सीजन ब्लू या रंगामध्ये उपलबद्ध
स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले
1080×2400 पिक्सल्स रेजॉलूशन
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर
८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज
अँड्रॉयड १० सोबत येणाऱ्या या फोनमध्ये कंपनीचे कस्टम Funtouch OS 11
४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा ट्रिपल कॅमेरा
८ मेगापिक्सलचा सेकंडरी वाइड अँगल लेन्स
सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
4100mAh बॅटरी
३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट