News Flash

ड्युअल कॅमेरा + 5,000 mAh ची दमदार बॅटरी, परवडणाऱ्या किंमतीत Vivo Y11 झाला लाँच

फिंगरप्रिंट सेंसर, AI फेस ब्युटी मोड यांसारखे फीचर्स आणि किंमत केवळ...

Vivo कंपनीने आपल्या Y सीरिजअंतर्गत नवीन स्मार्टफोन Vivo Y11 लाँच केला आहे. केवळ 8 हजार 990 रुपये किंमत असलेल्या Vivo Y11 या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. हा स्मार्टफोन 24 डिसेंबरपासून सर्व ऑफलाइन चॅनेल्स आणि व्हिवो इंडिया ई-स्टोरमध्ये उपलब्ध झाला आहे. अ‍ॅमेझॉन, पेटीएम मॉल, टाटा क्लिक आणि बजाज ईएमआय ई-स्टोरमध्ये 25 डिसेंबरपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. तर, फ्लिपकार्टवर हा फोन 28 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

ऑफर –
फिंगरप्रिंट सेंसर, AI फेस ब्युटी मोड यांसारखे फीचर्स असलेला हा फोन एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डवरुन इएमआयद्वारे खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. ही ऑफर ऑफलाइन खरेदीसाठी असून 31 डिसेंबर 2019 पर्यंतच ही ऑफर लागू असेल. याशिवाय, जर हा फोन ऑनलाइन खरेदी केल्यास 6 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्याय मिळेल.

स्पेसिफिकेशंस –
डिस्प्ले – 6.5 इंचाचा HD+ Halo फुलव्ह्यू डिस्प्ले
प्रोसेसर – 12 एनएम ऑक्टा-कोर प्रोसेसर
रॅम – 3 जीबी रॅम आणि 32 जीबीचा स्टोरेज
कॅमेरा – ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा. याशिवाय सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा
ओएस – अँड्रॉइड-9 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टम Funtouch OS9

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 2:27 pm

Web Title: vivo y11 with 5000mah battery launched in india price is rs 8990 know offers specifications and other details sas 89
Next Stories
1 जाणून घ्या, कशी होते ख्रिसमस ट्रीची शेती?
2 Tata Nexon EV : ‘टाटा’ची पहिली इलेक्ट्रिक कार, ‘झिपट्रॉन’ तंत्रज्ञानाचा वापर
3 Video : सीमेवरील जवानानी जिंगल बेल… जिंगल बेल म्हणत साजरा केला ख्रिसमस
Just Now!
X