Vivo Z1 Pro हा स्मार्टफोन खरेदी करण्याची आज(दि.26) तुमच्याकडे पुन्हा संधी आहे. फ्लिपकार्ट आणि Vivo कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या स्मार्टफोनसाठी दुपारी 12 वाजेपासून अजून एका सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. इन-डिस्प्ले कॅमेरा या फीचरसह 20 हजारापेक्षा कमी किंमत असलेला हा कंपनीचा पहिलाच फोन आहे. सोनिक ब्ल्यू, सोनिक ब्लॅक आणि मिरर ब्लॅक अशा तीन रंगाचे पर्याय या फोनसाठी देण्यात आले आहेत. मल्टिटास्किंगमध्ये अर्थात एकाच वेळी अनेक अॅप्लिकेशनचा वापर करण्यात हा फोन अग्रेसर असेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक आकर्षक ऑफर्स देखील आहेत. यात रिलायंस जिओकडून 6 हजार रुपये कॅशबॅक मिळेल. MyJio app मध्ये 150 रुपयांच्या 40 कुपनच्या रुपात ही कॅशबॅक मिळेल. याशिवाय व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांनाही हा फोन खरेदी केल्यास 3,750 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.तसंच फ्लिपकार्ट अॅक्सीस बँक क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डने खरेदी केल्यास 5 टक्के सवलतही मिळेल.
हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम+128 जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. अनुक्रमे 14 हजार 990 रुपये, 16 हजार 990 रुपये आणि 17 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत ठेवण्यात आली आहे. Vivo Z1 Pro स्मार्टफोनमध्ये पंच होल कॅमेऱ्यासह 6.53 इंचाचा IPS LCD FHD+ डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन एसडी 712 प्रोसेसर असून डेडिकेटेड AI बटण आहे. स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 व 2 मेगापिक्सलचे अन्य कॅमेरे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा अंडर-डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला असून याला पंच होल डिस्प्लेच्या डिझाईनमध्ये फिट करण्यात आलेले आहे. कॅमेऱ्याद्वारे दर्जेदार प्रतिमा घेता येणार असून यात फोर-के व्हिडीओचा सपोर्टही दिलेला आहे. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह तब्बल 5 हजार मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा फनटच ओएस 9 हा युजर इंटरफेस दिलेला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2019 11:46 am