News Flash

Vivo चा चार कॅमेऱ्यांचा फोन स्वस्तात खरेदीची संधी; मिळेल 4,500 mAh ची दमदार बॅटरी

डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी खास SCHOTT Xensation ग्लासचा वापर

चार कॅमेरे आणि दमदार बॅटरी असलेला Vivo Z1x हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर हा फोन भरघोस सवलतीसह उपलब्ध आहे. 19,900 रुपये किंमत असलेला हा फोन फ्लिपकार्टवर केवळ 15 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय या फोनच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफरद्वारे 14,050 रुपये डिस्काउंटही मिळू शकते.

आणखी वाचा – Xiaomi चा बजेट स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळेल 5000 mAh ची दमदार बॅटरी

फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 जी प्रोसेसरसोबत 4,500 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सुपर वाइड-एंगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेऱ्यासोबत स्मार्टफोनमध्ये इन- डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याशिवाय फोनमध्ये 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी खास SCHOTT Xensation ग्लासचा वापर करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 2:34 pm

Web Title: vivo z1x get huge discount on flipkart sas 89
Next Stories
1 तातडीने Delete करा 24 धोकादायक Apps, गुगलने प्ले स्टोअरवरुनही हटवले
2 Airtel चा स्वस्त प्लॅन! 2GB डेटा-अनलिमिटेड कॉलिंग आणि बघा 10 हजाराहून अधिक चित्रपटही
3 WhatsApp Pay ला मिळाली मंजुरी, ठरणार सर्वात मोठी Mobile Payment सेवा?
Just Now!
X