रिलायन्स जिओ आणि त्याबरोबरच बाजारात सुरु असलेल्या स्पर्धेत आपला टिकाव लागावा यासाठी टेलिकॉम कंपन्या एकाहून एक ऑफर्स जाहीर करत आहेत. जिओ आणि एअरटेलने नुकतेच आपल्या काही प्लॅनमध्ये बदल केल्यानंतर आता व्होडाफनही या स्पर्धेत उतरली आहे. देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होडाफोनतर्फे कायमच आपल्या यूजर्सना विविध प्लॅन्स देऊन खूश केले जाते. व्होडाफोनने आपले दोन नवीन प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केले आहेत. या प्लॅनची किंमत १५१ आणि १५८ रुपये ठेवण्यात आली आहे.

१५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच २८ जीबी ३ जी आणि ४ जी डेटा मिळेल. कॉलिंगच्या बाबतीत अनलिमिटेड म्हटले असेल तरीही २५० मिनिटे बोलता येईल असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर युजर १ आठवड्यात १ हजार मिनिटांहून अधिक व्हाईस कॉलिंग करू शकणार नाही. या प्लॅनची व्हलीडिटी २८ दिवसांची आहे. गरजेनुसार महिन्याभरात तुम्ही तुमच्या सोयीनुसार या डेटाचा वापर करु शकता. दुसरा प्लॅन १५१ रुपयांचा आहे. यात २८ दिवसात अनलिमिटेड कॉलिंगबरोबरच रोज रोज १ जीबी ४ जी किंवा ३ जी डेटा देण्यात येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही दर दिवसाला १ जीबीहून अधिक डेटा वापरू शकणार नाही. सध्या हा प्लॅन केरळमध्ये सुरु असला तरी येत्या काळात तो इतर सर्कलमध्येही सुरु होईल असे सांगण्यात आले आहे.