19 September 2020

News Flash

Vodafone ने आणले चार शानदार प्लॅन, 24 रुपयांपासून सुरूवात

व्होडाफोनने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणले चार नवे प्लॅन

Vodafone ने चार नवीन प्रीपेड रीचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये 129 रुपये, 199 रुपये आणि 269 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. याशिवाय 24 रुपयांचा एक अतिरिक्त प्लॅन देखील कंपनीने आणला आहे. अद्याप Idea ने हे प्लॅन्स आपल्या ग्राहकांसाठी लाइव्ह केलेले नाहीत. जाणून घेऊया या प्लॅन्सबाबत :

Vodafone Rs. 269 –
269 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 4 जीबी डेटा मिळेल. 56 दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये युजर्सना 600 एसएमएस पाठवता येतील. याशिवाय Vodafone Play आणि Zee5 या अ‍ॅप्ससाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Vodafone Rs. 199 –
199 रुपयांच्या या प्लॅनची वैधता 21 दिवस आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1 जीबी डेटासह युजर्सना दररोज 100 एसएमएस पाठवता येतील. या प्लॅनमध्येही Vodafone Play आणि Zee5 या अ‍ॅप्ससाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Vodafone Rs. 129 –
129 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉल, 2 जीबी डेटा आणि एकूण 300 एसएमएस मिळतील. या प्लॅनची वैधता 14 दिवस आहे. या प्लॅनमध्येही युजर्सना Vodafone Play आणि Zee5 या अ‍ॅप्ससाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Vodafone Rs. 24 plan –
24 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 100 ऑन-नेट नाइट कॉलिंग मिनिट मिळतात. ऑन-नेट कॉलिंग मिनिट रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत वापरता येतील. मात्र, अन्य लोकल/ नॅशनल कॉलिंगसाठी 2.5 पैसे प्रतिसेकंद दर आकारला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 12:51 pm

Web Title: vodafone brings new rs 24 rs 129 rs 199 and rs 269 prepaid plans know everything sas 89
Next Stories
1 Video: दोन अवाढव्य सी लायन्स बोटीवर चढले आणि….
2 Alert ! चुकूनही वापरू नका हे 50 धोकादायक पासवर्ड
3 Realme X2 Pro : भारतासाठी लवकरच नवीन व्हेरिअंट, किेंमत किती?
Just Now!
X