व्होडाफोनने एप्रिल महिन्यात 139 रूपयांचा एक नवा प्लॅन लॉन्च केला होता. त्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस आणि 5 जीबी डेटा देण्यात येत होता. या प्लॅनमध्ये आता बदल करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. यामध्ये मिळणारा डेटा कमी करण्यात आला असून आता त्यामध्ये 5 जीबी ऐवजी 3 जीबी डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांचीच असेल.

एअरटेलनेही 148 रूपयांच्या प्लॅनमध्ये युझर्सना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधा दिली आहे. तसेच याव्यतिरिक्त दररोज 100 एसएमएसही देण्यात येत आहे. याची वैधता 28 दिवसांची असून त्यासोबत 3 जीबी डेटाही देण्यात येत आहे. याशिवाय युझर्सना एअरटेल टिव्हीचे आणि विंक म्युझिकचे सबस्क्रीप्शनही देण्यात येत आहे.

व्होडाफोनचे या रेंजमध्ये आणखी दुसरे प्रीपेड प्लॅन्सही आहेत. सध्या व्होडाफोन या रेंजमध्ये 119 रूपये, 129 रूपये आणि 169 रूपयांचे काही प्लॅन ऑफर करत आहे. 119 रूपयांच्या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा मिळत असून त्याची वैधता 28 दिवसांची आहे. तर 129 रूपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 1.5 जीबी डेटा देण्यात येत आहे. यापूर्वी व्होडाफोनने 999 रूपयांचा लाँग टर्म प्लॅनदेखील लॉन्च केला होता. याची वैधता 1 वर्षाची असून यामध्ये 12 जीबी हायस्पीड डेटा देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त युझर्सना अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधाही देण्यात येत आहे.