रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व्होडाफोन आयडियाने (Vi) चार खास प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्ससोबत Vi कंपनी मोफत Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शनही देत आहे. व्होडाफोन-आयडियाने 401 रुपये, 501 रुपये, 601 रुपये आणि 801 रुपयांचे चार प्लॅन आणले आहेत. या प्लॅन्समध्ये दररोज ३ जीबी डेटा, मोफत Disney+ Hotstar VIP सबस्क्रिप्शनसोबतच अतिरिक्त डेटा , फ्री व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएसचाही फायदा मिळतो. जाणून घेऊया सविस्तर :

Vi 401 रुपयांचा प्लॅन :-
401 रुपयांच्या प्रिपेड रिचार्ज प्लॅनमध्ये डिझ्नी + हॉटस्टार व्हीआयपीचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 3GB डेटासोबत 16GB अतिरिक्त डेटा मिळतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील वापरायला मिळतात. याशिवाय रात्रीच्या वेळी हाय-स्पीड इंटरनेट, वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi movies आणि टीव्ही या सेवाही वापरता येतात.

Vi 501 रुपयांचा प्लॅन :-
Vi च्या या प्लॅमध्ये केवळ डेटाचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये ५६ दिवसांच्या वैधतेसह ७५ जीबी डेटा मिळतो. यात एका वर्षासाठी डिझ्नी + हॉटस्टार व्हीआयपीचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं, पण डेटाओन्ली प्लॅन असल्यामुळे फ्री कॉलिंग किंवा एसएमएसची सेवा मिळत नाही.

Vi 601 रुपयांचा प्लॅन :-
या प्लॅनमध्येही एका वर्षासाठी डिझ्नी + हॉटस्टार व्हीआयपीचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. या प्लॅनमध्ये युजर्सना ५६ दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा मिळतो. तसेच 16GB अतिरिक्त डेटा मिळतो. याशिवाय रात्रीच्या वेळी हाय-स्पीड इंटरनेट, वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi movies आणि टीव्ही या सेवाही वापरता येतात.

Vi 801 रुपयांचा प्लॅन :-
तर, Vi च्या या प्लॅनमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा मिळतो. तसेच, रात्रीच्या वेळी हाय-स्पीड इंटरनेट, वीकेंड डेटा रोलओव्हर, Vi movies आणि टीव्ही या सेवाही वापरता येतात. याशिवाय या प्लॅनमध्येही कंपनीकडून 16GB अतिरिक्त डेटा मिळतो.