व्होडाफोन-आयडिया कंपनीने आपल्या युजर्ससाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने 84 दिवसांच्या वैधतेसह 819 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे.

819 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि STD कॉल्सची सेवा मिळते. तसेच, 84 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा वापरण्यास मिळेल. कंपनीच्या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना 499 रुपयांचे व्होडाफोन-प्ले (Vodafone Play) आणि 999 रुपयांच्या झी-5 चाही फ्री अॅक्सेस मिळतो. याशिवाय 100 एसएमएसची सेवेचाही लाभ मिळेल. नवीन प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध झाला आहे. पण सध्या हा प्लॅन फक्त दिल्ली सर्कलसाठी उपलब्ध झाला आहे. मात्र लवकरच सर्व सर्कलसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय, टेलिकॉम कंपनी Vodafone ने काही दिवसांपूर्वी आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी RED MAX प्लॅन देखील आणला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 699 रुपयांमध्ये अनेक सुविधा देत आहे. सध्या हा प्लॅन माय व्होडाफोन अ‍ॅपवर उपलब्ध झाला आहे. 699 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. ही सुविधा लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंगसाठी असेल. याव्यतिरिक्त व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एका वर्षासाठी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ , झी-5, SUN NXT आणि व्होडाफोन-प्ले सबस्क्रिप्शन मिळेल. पण नेटफ्लिकचा अ‍ॅक्सेस या प्लॅनमध्ये मिळणार नाही. याशिवाय 100 एसएमएस आणि विशेष म्हणजे ग्राहकांना 4G अनलिमिटेड डेटा वापरण्यास मिळतो. पण नेमका किती डेटा ग्राहकांना मिळेल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. कंपनीचा हा प्लॅन सध्या काही सर्कलमध्येच उपलब्ध झाला आहे. दरम्यान, आयडियाच्या पोस्टपेड ग्राहकांना कंपनीने काही दिवसांपूर्वीच व्होडाफोन रेड प्लॅनमध्ये शिफ्ट केलं आहे. त्यामुळे हे ग्राहकही आता व्होडाफोन रेड फॅमिलीमध्ये आले आहेत. म्हणजेच या प्लॅनचा फायदा ‘आयडिया निर्वाण’च्या ग्राहकांनाही घेता येईल.