सध्या सर्वच दूरसंचांर कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याशी जोडून ठेवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांकडून सातत्यानं नवनवे प्लॅन्स आणले जात आहेत. दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया आपल्या पोस्टपेड प्लॅनची रेंज वाढवण्याच्या तयारीत आहे. नुकताच कंपनीनं REDX फॅमिली पोस्टपेड प्लॅन सुरू केला होता. त्यानंतर आता कंपनीनं आपल्या ग्राहकांसाठी एंटरटेन्मेंट प्लस फॅमिली पोस्टपेड प्लॅन आणला आहे. ९४८ रूपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड बेनिफिट्स देत आहे.

९४८ रूपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि १०० मोफत एसएमएस सुविधा देत आहे. याव्यतिरिक्त हा प्लॅन प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन कनेक्शनसह मिळतो. प्रायमरी कनेक्शनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटाची सुविधा देण्यात येत आहे. तर सेकंडरी कनेक्शनमध्ये कंपनी ग्राहकांना ३० जीबी डेटा देत आहे.

या प्लॅनसोबत मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्स बद्दल सांगायचं झालं तर यासोबत एका वर्षाचं अॅमेझॉन प्राईमचंही सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त एका वर्षासाठी झी ५ आणि Vi मुव्हीज अँड टीव्ही अॅप या सेवांचाही लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. या प्लॅनचा वापर करणाऱ्यांना सेकंडरी कनेक्शन बंद करता येणार नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना पाच कनेक्शन अॅड करता येणार आहेत. सध्या केवळ युपी ईस्ट या सर्कलसाठी हा प्लॅन लाँच करण्यात आला असून पुढील कालावधीत अन्य सर्कलमध्येही हा प्लॅन लाँच होण्याची शक्यता आहे.