News Flash

Vodafone Idea ने लाँच केला ‘डिजिटल एक्सक्लुझिव्ह’ प्लॅन, जाणून घ्या ऑफर

56 दिवसांची व्हॅलिडिटी, मिळेल दररोज 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगही...

(संग्रहित छायाचित्र)

टेलिकॉम कंपनी व्होडाफोन-आयडिया(VI) आपल्या ऑनलाइन सिम कार्ड डिलिव्हरी सेवेचा विस्तार करत आहे. यासाठी कंपनीने एक नवीन 399 रुपयांचा डिजिटल एक्सक्लुझिव्ह प्रिपेड प्लॅन आणला आहे. जे ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरुन ऑनलाइन सिम कार्ड ऑर्डर करतील त्यांच्यासाठी कंपनीने हा प्लॅन आणला आहे.

399 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :-
399 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह दररोज 1.5GB डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100SMS ची सुविधाही आहे. तसंच, या प्लॅनमध्ये युजर्स Vi movies आणि TV चा अ‍ॅक्सेसही मिळेल. हा रिचार्ज प्लॅन Vi च्या सध्याच्या ग्राहकांसाठी ऑनलाइन उपलब्ध आहे. मात्र नवीन ग्राहकांना या प्लॅनचा फायदा ऑनलाइन सिम कार्ड खरेदी केल्यासच मिळेल. त्यामुळे कंपनीने याला ‘डिजिटल एक्सक्लुझिव्ह’ प्लॅन म्हटलं आहे.

Vi ने आणले FRC प्लॅन :- 
Vi ने नवीन रिचार्ज प्लॅन ‘फर्स्ट रिचार्ज’ (FRC) प्लॅनअंतर्गत आणले आहेत. यामध्ये 97 रुपये, 197 रुपये, 297 रुपये, 497 रुपये आणि 647 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा समावेश आहे. तर, 399 रुपयांचा FRC प्लॅन ऑनलाइन ग्राहकांसाठी आहे. 399 रुपयांच्या FRC प्लॅनशिवाय कंपनीने 299 रुपयांचा FRC प्लॅनही आणला आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 100SMS ची सुविधा मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 2:47 pm

Web Title: vodafone idea starts offering digital exclusive rs 399 plan to new users check details sas 89
Next Stories
1 WhatsApp चं नवीन फिचर, डेस्कटॉप व्हर्जनमधूनही करता येणार ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग
2 जबरदस्त ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन खरेदीची पुन्हा संधी, किंमत 10 हजार 999 रुपये
3 PUBG चाहत्यांसाठी बॅड न्यूज, सरकारची PUBG Mobile India च्या लाँचिंगला परवानगी नाही
Just Now!
X