News Flash

दररोज 4GB डेटा आणि 84 दिवसांपर्यंत व्हॅलिडिटी, Vi चे जबरदस्त प्लॅन्स

कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसोबतच 'वीकेंड डेटा रोलओव्हर'चा पर्यायही ...

अन्य टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे व्होडाफोन-आयडिया अर्थात Vi कडेही आपल्या युजर्ससाठी अनेक Prepaid Plans आहेत. पण जर तुमचं काम दररोज 1 जीबी, 2 जीबी किंवा 3 जीबी डेटा प्लॅनद्वारे भागत नसेल तर आज आम्ही तुम्हाला दररोज 4 जीबी डेटा ऑफर करणाऱ्या प्लॅन्सबाबत माहिती देणार आहोत.

Vi 299 Plan: 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्रिपेड प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 4 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 112 जीबी डेटा मिळतो.

Vi 449 Plan: 450 रुपयांच्या या प्लॅनमध्येही दररोज 4 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवस आहे, म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 224 जीबी डेटा मिळतो.

Vi 699 Plan: 700 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या प्लॅनमध्येही प्रतिदिन 4 जीबी डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. म्हणजे युजर्सना या प्लॅनमध्ये एकूण 336 जीबी डेटा मिळतो.

आणखी वाचा- Jio च्या ‘ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंट’ला होणार सुरूवात; बक्षीस 12.50 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

अन्य फायदे : वरती दिलेल्या सर्व प्लॅन्समध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन 100 एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय या तिन्ही प्लॅन्समध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरचा पर्यायही आहे. वीकेंड डेटा रोलओव्हर म्हणजे सोमवार ते शुक्रवारदरम्यान न वापरलेला डेटा तुम्ही आठवड्याच्या अखेरीस वापरु शकतात. याशिवाय या तिन्ही प्लॅन्समध्ये Vi Movies आणि Vi TV या अ‍ॅपचा फ्री अ‍ॅक्सेस मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 4:17 pm

Web Title: vodafone idea vi offers 4gb daily data plans vi 299 plan vi 449 plan vi 699 plan ckeck details sas 89
Next Stories
1 Jio च्या ‘ऑनलाइन गेमिंग टुर्नामेंट’ला होणार सुरूवात; बक्षीस 12.50 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स
2 2000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा जबरदस्त स्मार्टफोन, मिळेल पाच कॅमेऱ्यांसह 6GB रॅम + 5,000mAh बॅटरी
3 आता कारच्या पुढील दोन्ही सीटसाठी Air Bag देणं बंधनकारक? ‘या’ तारखेपासून लागू होऊ शकतो नवा नियम
Just Now!
X