10 April 2020

News Flash

Vodafone ग्राहकांसाठी Good News, कंपनीने बदलला ‘हा’ प्रीपेड प्लॅन

व्होडाफोन युजर्सना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी आपले प्लॅन बदलत आहे.

टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने आपल्या १२९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केला आहे. यापूर्वी कंपनीने 499 आणि 555 रुपयांचे प्लॅन देखील बदलले आहेत.

आता कंपनीने १२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केल्यामुळे या प्लॅनमध्ये मिळणारी वैधता १० दिवसांनी वाढलीये. व्होडाफोनने काही महिन्यांपूर्वी १२९ रुपयांचा प्लॅन जिओला टक्कर देण्यासाठी आणला होता. आतापर्यंत या प्लॅनमध्ये ग्राहकांना १४ दिवसांची वैधता मिळत होती. पण, आता बदल करण्यात आल्याने १० दिवस अधिक वैधता म्हणजे २४ दिवसांची वैधता मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह ३०० एसएमएस आणि २ जीबी इंटरनेट डेटाची ऑफर आहे. तसेच या प्लॅनमध्ये ९९९ रुपये किंमतीच्या व्होडाफोन प्लेचे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल. बदललेल्या प्लॅनचा लाभ मुंबई, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील ग्राहकांना मिळणार आहे. राजस्थानमध्ये या प्लानची वैधता २१ दिवसांची आहे. तर बाकी सर्कलमध्ये १४ दिवसांची वैधता दिली जात आहे. अन्य सर्कलमध्येही हा प्लॅन लवकरच उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2020 10:18 am

Web Title: vodafone increases validity of 129 rupees plan to 24 days sas 89
Next Stories
1 केसांना तेल लावताना काय करावं आणि काय टाळवं
2 शारीरिक व्यायामाने मेंदूला फायदा
3 Dessert Recipes for Valentine’s Day : स्ट्रॉबेरी चीज केक
Just Now!
X