20 January 2021

News Flash

व्होडाफोन: 229 रुपयांचा नवा प्लान, दररोज मिळणार 2 जीबी डेटा

याशिवाय 16 रुपयांचा एक 'फिल्मी' प्लानदेखील कंपनीने आणला आहे.

संग्रहित छायाचित्र

टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक नवा प्लान आणला आहे. 229 रुपयांचा हा प्लान केवळ प्रीपेड ग्राहकांसाठी आहे.

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार व्होडाफोनच्या या प्लानमध्ये अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस मोफत मिळतील. तसंच या प्लानमध्ये 28 दिवसांपर्यंत दररोज 2 जीबी इंटरनेट डेटा ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय युजर्सना लाइव्ह टीव्ही आणि चित्रपट पाहता यावेत यासाठी कंपनीकडून मोफत व्होडाफोन प्ले अॅपचा वापर करता येईल. हे फायदे आधी कंपनीच्या 255 रुपयांच्या प्लानमध्ये होते, पण आता त्याच प्लानची किंमत कमी करण्यात आली आहे. याशिवाय 16 रुपयांचा एक ‘फिल्मी’ प्लानदेखील कंपनीने आणला असून या प्लानमध्ये युजर्सना एक जीबी 3जी/4जी डेटाची ऑफर आहे. ऑनलाइन चित्रपट आणि शो पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा खास प्लान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:37 pm

Web Title: vodafone launches new 229rs prepaid offer sas 89
Next Stories
1 Mi Days ! शाओमीच्या मोबाइल खरेदीवर 6,500 रुपयांपर्यंत सवलत
2 कधीपासून सुरू होणार Jawa ची डिलिव्हरी?
3 सॅमसंगचं ‘झकास’ स्मार्टवॉच, Galaxy Watch Active भारतात लाँच
Just Now!
X