रिलायन्स जिओ आणि त्याबरोबरच बाजारात सुरु असलेल्या स्पर्धेत आपला टिकाव लागावा यासाठी टेलिकॉम कंपन्या एकाहून एक ऑफर्स जाहीर करत आहेत. नुकतीच व्होडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नव्या प्लॅन्सची घोषणा केली आहे. या नव्या प्लॅनमार्फत ग्राहकांना इंटरनेट डेटा, एसएमएस, लोकल-एसटीडी-राष्ट्रीय आणि रोमिंग कॉल्सची यांच्या अनेक आकर्षक ऑफर्स देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

५०९ रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला १ जीबी इंटरनेट डेटा, रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी आणि राष्ट्रीय रोमिंग कॉल्स मिळणार आहेत. या प्लॅनची व्हॅलिडीटी ८४ दिवसांची असेल. त्यामुळे ज्यांना जास्त प्रमाणात इंटरनेटची आवश्यकता असते त्यांच्यासाठी हा प्लॅन अतिशय उपयुक्त ठरणार आहे. याबरोबरच ४५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये हीच सुविधा ७० दिवसांसाठी आणि ३४७ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी देण्यात आली आहे. मात्र यामध्ये ग्राहकांना दिवसाला १.५ जीबी डेटा मिळणार आहे.

व्होडाफोनचे हे नवे प्लान्स सगळ्या स्टोर्स आणि माय व्हो़डाफोन अॅपमधून विकत घेता येणार आहेत. देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होडाफोनतर्फे कायमच आपल्या यूजर्सना विविध प्लॅन्स देऊन खूश केले जाते. या नव्या प्लॅनमुळे जिओ, आयडीया, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे.