मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या जोरदार वॉर सुरु असून एकमेकांमध्ये वरचढ होण्यासाठी या कंपन्या सातत्याने नवनवीन प्लॅन जाहीर करत असतात. रिलायन्स जिओ आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक आकर्षक प्लॅन आणला आहे. व्होडाफोन आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी ११९ रुपयांचा आकर्षक प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि एक जीबी डेटा प्रतिदिवस मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये एसएमएसची सुविधा नसणार आहे. एसएमसच्या सुविधासाठी १६९ रूपयांचा आहे. त्यामध्ये प्रतिदिन फ्री कॉलिंग आणि एक जीबी डेटांसह दररोज १०० एसएमएस मिळणार आहेक. हे दोन्ही प्लॅन सध्या मोजक्याच 4G सर्कलसाठी सध्या उपलब्ध आहे. लवकरच याचा विस्तर पूर्ण भारतभर होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.

व्होडाफोनने नुकताच १६९९ रुपयांचा एक लाँग टर्म प्लान सादर केला होता. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉलिंग फ्री असणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना प्रतिदिवस १०० एसएमएस आणि १ जीबी डेटा मिळणार आहे. फ्री डेटा संपल्यानंतर युजर्सना ५० पैसे प्रति एमबीच्या दराने अतिरिक्त डेटा मिळेल. या प्लानची वैधता ३६५ दिवस असणार आहे.

या प्लॅन व्यतिरिक्त व्होडाफोनने आणखी दोन प्लॅन सादर केले आहेत. १०० आणि ५०० रूपयांच्या प्लॅनमध्ये फुलटॉकटाईम मिळणार आहे. याची वैधता अनुक्रमे २८ आणि ८४ दिवस आहे.