टेलिकॉम कंपन्यांनी गेल्या महिन्यात दरवाढ केल्यापासून ग्राहकांना सर्वाधिक चिंता प्लॅनमध्ये दररोज मिळणाऱ्या मर्यादित इंटरनेट डेटाबाबत आहे. ग्राहकांचं हेच टेन्शन दूर करण्यासाठी व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी दोन नवे प्लॅन आणले आहेत. 558 रुपये आणि 398 रुपयांचे हे प्लॅन असून यामध्ये ग्राहकांना दररोज 3जीबी डेटा, मोफत अमर्यादित कॉलिंग आणि अन्य अनेक सुविधा मिळतील.

व्होडाफोन 558 रुपये प्लॅन –
56 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 3जीबी डेटा आणि 100 फ्री एसएमएस मिळतात. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. याशिवाय 499 रुपये किंमतीचे व्होडाफोन प्ले सब्सक्रिप्शन आणि 999 रुपये किंमत असलेल्या ZEE5 चे सब्सक्रिप्शन मोफत मिळेल.

व्होडाफोन 398 रुपये प्लॅन –
व्होडाफोनच्या या प्लॅनमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये 558 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच व्होडाफोन प्ले आणि ZEE5 चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. व्होडाफोनचा 558 रुपयांचा प्लॅन मध्य प्रदेश सर्कल आणि 398 रुपयांचा प्लॅन मुंबई आणि मध्य प्रदेश सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

19 रुपयांचा प्लॅन –  
या प्लॅनमध्येही आता ग्राहकांना अधिक डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये आता 150MB ऐवजी 200MB डेटा मिळतो. दोन दिवस वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमनिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.