टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवा प्लॅन आणला आहे. जिओ आणि एअरटेल यांसारख्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने 69 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने हा प्लॅन बोनस कार्डच्या श्रेणीमध्ये ठेवला आहे, यानुसार वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळ्या सुविधा मिळतील. जाणून घेऊया काय आहे या प्लॅनची खासियत आणि इतर कंपन्यांची ऑफर –

व्होडाफोनचा 69 रुपयांचा प्लॅन –
28 दिवस इतकी व्होडाफोनच्या नव्या 69 रुपयांच्या प्लॅनची वैधता आहे. यामध्ये ग्राहकांना 250 MB 3जी/4जी डेटा आणि 100 एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय मुंबई सर्कलमधील युजर्सना कॉलिंगसाठी 150 लोकल व एसटीडी मिनिट मिळतील. तर, दिल्ली-एनसीआर सर्कलमध्ये 150 मिनिट कॉलिंगच्या सेवेचा वापर रोमिंगमध्येही करता येईल.

आणखी वाचा- व्होडाफोन-आयडियाचा नवा प्लॅन, मिळणार 150GB अतिरिक्त इंटरनेट डेटा

एअरटेल आणि जिओ –
वोडाफोनच्या या प्लॅनची थेट टक्कर एअरटेलच्या 65 रुपयांच्या प्लॅनशी आहे. एअरटेलच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून एक जीबी डेटासह अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते. तर, जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून यामध्ये 2 जीबी डेटा, 300 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. यापूर्वी व्होडाफोनने 45 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणला होता. यामध्ये फुल टॉक-टाइमची सुविधा व 100 एमबी इंटरनेट डेटाची सुविधा मिळते.