एअरटेलला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने एक नवा प्लॅन सादर केला आहे. कॉल करण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या ग्राहकांचा विचार करुन व्होडाफोनने व्होडाफोनने हा नवा प्लॅन आणला आहे. 597 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 168 दिवसांची व्हॅलिडिटी असणार आहे. मात्र, केवळ फिचर फोन वापरणाऱ्यांसाठीच 168 दिवसांची व्हॅलिडिटी असेल, तर इतर स्मार्टफोन युजर्ससाठी 112 दिवसांची व्हॅलिडिटी असेल.

या प्लॅनमध्ये युजरला अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स करता येणार आहेत. मात्र कॉल करताना युजर दर दिवशी 250 मिनिट आणि दर आठवड्याला 1000 मिनिट कॉलिंग करु शकतात. याशिवाय युजरला डेटाचा वापरही करता येणार आहे. 10GB 4G आणि 3G डेटा युजरला वापरता येईल.

सर्वप्रथम एअरटेलने 597 रुपयांचा प्लॅन आणला होता. एअरटेलच्या या प्लॅनची व्हॅलिडिटीही 112 दिवसांची असून फिचर फोन वापरणाऱ्यांसाठी 168 दिवसांची व्हॅलिडिटी आहे. मात्र, एअरटेलच्या या प्लॅनमध्ये व्हॉइस कॉलिंगसाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.